आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या बस अपघातात 7 शालेय विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू, त्यामधील एका जखमी मुलीला वाचवण्यासाठी लागणार 5 ते 7 लाख, कुटूंबियांना मंत्री किंवा कलेक्टर कडून मिळाली नाही मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत| सहलीसाठी गेलेल्या ट्यूशन क्लासच्या बसचा डांगमध्ये अपघात झाला होता. यामध्ये जखमी झालेल्या मुलांचे कुटूंबिय आता मदतीसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. गंभीर जखमी झालेल्या 11 वर्षांच्या प्रियांशीला सिव्हिलमध्ये 12 तास योग्य उपचार मिळाले नाही, तेव्हा कुटूंबिय तिला अठवा गेट येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टर म्हणाले की, 72 तास वाट पाहावी लागले आणि 5-7 लाख रुपयांचा बंदोबस्त करावा लागेल. 

आता प्रियांशीची तब्येत धोक्याबाहेर आहे, पण कुटूंबिय पैशांची जमवाजमव करताना अडचणीत आहेत. त्यांना कुठूनही मदत मिळत नाहीये. बुधवारी त्यांनी सर्वात पहिले आरोग्य राज्य मंत्र्यांसोबत संपर्क केला, नंतर ते कलेक्टर ऑफिसमध्ये गेले. पण दोन्हीही ठिकाणाहून त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागले. पण अजून रुग्णालयाने कुटूंबांकडून पैसे मागितलेले नाही. 

 

अशी अवस्था : हात, पाय, डोके आणि छातीत गंभीर जखम 
प्रियांकी 6 वीमध्ये शिकते. अपघातात तिचा हात, पाय, डोके आणि छातीमध्ये जखमा झाल्या आहेत. बेशुध्द अवस्थेत तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ट्रामा सेंटरमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तिला सर्जिकल आयसीयूमध्ये पाठवण्यात आले होते. रात्रभर तिला आराम मिळाला नाही तर कुटूंबियांनी घाबरुन तिला खासगी रुग्णालयात हलवले होते. 

 

घोषणेचे एक लाख कुठून मिळणार याची माहिती नाही 
प्रियांशीचे काका जयेश पटेलने सांगितले की, मदतीसाठी मंत्रीसोबत बातचित केली तर ते म्हणाले की, कलेक्टरला भेटा मदत होईल. आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो. तिथे चौथ्या मजल्यावरील एक अधिकारी म्हणाला - उपचारांसाठी पैसे द्यायचे आहे याची आम्हाला काहीच माहिती नाही. घोषणेमधील एक लाख रुपये कुठून मिळणार आहे, याची काहीच माहिती मिळालेली नाही. 

 

आता रेवन्यू विभागाने सिव्हिलमधून मागितली लिस्ट 
सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ डॉ. केतन नायक यांनी म्हटले की, रेवेन्यू विभागाने बुधवारी जखमींची माहिती मागितली आणि त्याची लिस्ट दिली. ही लिस्ट अहवाच्या रुग्णालयातून फायनल केली जाईल. सिव्हिलमध्ये अॅडमिट असणा-या जखमींची माहिती घेण्यात आली आहे. खासजी रुग्णालयात गेलेल्या जखमींचीही माहिती घेतली जात आहे.

 

गेल्या शनिवारी झाला होता अपघात, 10 जणांचा झाला होता मृत्यू 
शनिवारी डांग येथून सूरत येथे परतताना 200 फूट खोल दरीत बस कोसळली होती. यामध्ये 97 लोकांना बाहेर काढण्यात आले होते. तर 7 मुलांसोबत 10 जणांचा मृत्यू झाला होता. सुबीर पोलिस स्टेशनमध्ये ट्यूशन क्लास चालवणारी संजालिका नीता बिपिन पटेल, बस चालक संजय मेहता आणि इमिया ट्रॅव्हल्सच्या मालकाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दूसरीकडे सीएम विजय रुपाणी जखमींना भेटण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी मृत लोकांच्या कुटूंबियांना अडीच अडीच लाख आणि जखमींना एक-एक लाख रुपये देण्याची घोषणा केली. 

 

बातम्या आणखी आहेत...