आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशीरा येऊन घाई-घाईत चिमुकल्यांना घेऊन गेला ऑटो ड्रायव्हर, अवघ्या काही मिनिटांत आली वाइट बातमी; Video मध्ये टिपली हृदयद्रावक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - शाळेची वेळ 7 वाजताची होती. मुले-मुली तयार होऊन शाळेच्या गणवेशात ऑटो ड्रायव्हरची वाट पाहत होते. ठीक 7 वाजता ऑटो ड्रायव्हर आला. त्यांना मुलांना उशीर होतोय, लवकर निघा अशी घाई लावली. सर्वच मुलांना ऑटो रिक्शामध्ये बसवले आणि सुसाट निघून गेला. ऑटोची फायरिंग ऐकूणच पालकांच्या हृदयाचा ठोका वाढला. आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले. अवघ्या काही मिनिटांत संबंधित ऑटोचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 5 चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. ज्या मुलाचा या घटनेत मृत्यू झाला, त्याच ऑटोमध्ये त्याचा लहान भाऊ सुद्धा प्रवास करत होता. सुरत जिल्ह्यात घडलेली ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.


असा घडला अपघात
जखमींपैकी एका मुलाने सांगितल्याप्रमाणे, ऑटो ड्रायव्हर शुक्रवारी आपली गाडी घेऊन सकाळी 7 वाजता मुलांच्या घराजवळ पोहोचला. शाळेची वेळ 7 वाजताची होती. उशीर झाल्याने त्याने घाई करून सर्वांना ऑटोरिक्शामध्ये बसवले आणि सुसाट वेगाने निघाला. याच दरम्यान सुरतच्या पीयूष पॉइंटजवळ त्याने अचानक ब्रेक लावला. ब्रेक लावताच भरधाव ऑटोचा तोल गेला आणि एक 8 वर्षांचा मुलगा बाहेर पडला. त्याच मुलाच्या अंगावर ऑटो पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. उर्वरीत जखमी मुलांना रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी काहींना प्राथमिक उपचार करून तर काहींना दाखल करावे लागले. पोलिसांनी या प्रकरणी ऑटो रिक्शा चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.


संतप्त पालकांकडून प्राचार्याला मारहाण
अॅडम्स पब्लिक स्कूलमध्ये मुलांना ये-जा करण्यासाठी बसची व्यवस्था होती. परंतु, बस बिघडल्याने कित्येक दिवसांपासून शाळेने ऑटोरिक्शाचा बंदोबस्त केला होता. यासाठी एका-एका मुलाच्या पालकाकडून मासिक 400 रुपये घेतले जात होते. शाळेच्या ऑटो रिक्शात मुलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ग्रिल लावल्या जातात. परंतु, या ऑटोमध्ये तशी काहीच व्यवस्था नव्हती. ऑटो स्लिप होताच मुलगा बाहेर फेकल्या गेला. या दुर्घटनेनंतर पालकांना शाळेला घेराव टाकला. तसेच प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जाऊन त्याची धुलाई देखील केली. 

 

बातम्या आणखी आहेत...