आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाला कमी वयात नव्हता करायचा आईचा रोल तर कुणाला लीड रोल सांगून दिले गेले साइड कॅरेक्टर, अशा कारणांमुळे 4 अभिनेत्रींनी मध्येच सोडल्या सीरियल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही अभिनेत्री चांदनी भगवानी जी सीरियल 'रूप- मर्द का नया स्वरूप' मध्ये पलक हि भूमिका साकारत आहे, तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती शोच्या प्रोड्यूसर्सवर खुश नाही. सुरुवातीला तिला लीड रोलसाठी घेतले गेले होते पण शो सुरु झाल्यानंतर मात्र जसे सांगितले गेले तसे काहीच नव्हते. चांदनी अशी एकटीच नाही, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी काही ना काही कारणांमुळे शोचा निरोप घेतला आहे. 

 

आज तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत...

चांदनी भगवानी​... 
- DainikBhaskar.com सोबत झालेल्या बातचितीमध्ये चांदनीने सांगितले, 'सांगितले गेले होते की माझा रोल महत्वाचा असेल. मी शोचो तिसरी लीड असेल. हो, हळू हळू माझे पात्र निगेटिव रोलमध्ये बदललेल पण दिलेल्या शब्दानुसार असे काहीच झाले नाही. मेकर्सने माझ्या भूमिकेला इंट्रोड्यूस केले पण दोन दिवसानानंतरच हे सर्व नाहीसे झाले. त्यानंतर मला परत इंट्रोड्यूस केले गेले आणि पुन्हा ते फेड झाले. मी महिन्यातून केवळ एक दिवस शूटिंग करत आहे. निश्चितच त्यामुळे एक कलाकार म्हणून माझे टॅलेंट इथे वाया जाते आहे. क्रिएटिव टीमसोबत मी या बाबतीत चर्चा केली पण त्यांनाही याबाबतीत माहित नव्हते की काय चालले आहे. त्यामुळे शेवटी मी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे'. 

 

सुरभी चंदना ... 
'इश्कबाज' सीरियलमधून सुरभी चंदनाच्या अचानक गायब होण्यामुळे फॅन्स हैराण झाले. सुरभी लीपनंतर आईचा रोल करण्यासाठी तयार नव्हती. बातचितीदरम्यान सुरभी म्हणाली, 'पहिले शोमध्ये मला आईचा रोल करायचा नव्हता. टीमचा विचार होता की माझ्या भूमिकेचे अनेक ग्राफ असतील जे  एक्सप्लोर केले जातील पण असे वाटले की ते हे सर्व करण्यात इंटरेस्टेड नाहीत, त्यामुळे मी शो सोडण्याचा निर्णय घेतला. हे म्युच्युअल डिसीजन होते'. 

 

दृष्टि धामी...  
दृष्टि धामी, शक्ति अरोरा आणि अदिति शर्मा शो 'सिलसिला बदलते रिश्तों का' यामध्ये काम करत होती. या शो मध्ये जे कंटेंट दाखवले जात होते ते प्रेक्षकान्ना पसंत पडत नव्हते. या कहाणीमध्ये नंदिनी (दृष्टि धामी) आपली बेस्ट फ्रेंड मौली (अदिति शर्मा) चा पती कुणाल (शक्ति अरोड़ा) च्या प्रेमात पडते. दृष्टि प्रेक्षकांच्या निगेटिव कमेंटने खूप परेशान झाली होती. ती स्टोरीमध्ये काही चेंज करून घेऊ इच्छित होती, पण असे झाले नाही. फॅन्स नाराज झाल्यानंतर तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला'.  प्रेक्षकांनी दृष्टिला 'घर तोडणारी' सुद्धा म्हणले. माहितीनुसर अशा कमेंट्स दृष्टिच्या शो सोडण्याचे कारण बनल्या. 

 

पूनम ढिल्लन... 
पूनम ढिल्लन ज्या 'दिल ही तो है' मध्ये सासूची भूमिका करत होत्या, त्यांनीही शो सोडला आहे.  त्या म्हणाल्या, 'जेव्हा मी शो जॉईन केला होता तेव्हा वाटले होते की हा शो चांगला चालेल पण नंतर असे वाटले की हा शो योगय पद्धतीने पुढे जात नाही. मी सेटवर अनकंफर्टेबल फील करायचे. काही दिवस शूट केल्यानंतर मी याबद्दल प्रोड्यूसरला सांगितले आणि शो सोडला'. 

बातम्या आणखी आहेत...