आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही हात नसलेल्या पुण्याच्या सुरेखा खुडे यांनी बजावला मतदानाचा हक्क, अनेकांसमोर ठेवला आदर्श

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात विधानसभेच्या आठ जागा आहे आणि या आठही जागांवर सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. अनेक तरुण वृद्ध अपंग मतदार येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. परंतु यातील एका महिलेने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण ​दोन्ही हात नसतानाही पुण्यातील सुरेखा खुडे या महिलेने मतदान पार पाडले. असे असूनही तिने समोर येऊन मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवांमध्ये आपले योगदान दिले. 



सुरेखा खुडे यांनी पर्वती मतदार संघातील भाऊसाहेब हिरे या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरेखा खुडे यांना दंडापासून दोन्ही हात नाहीत. पण उजव्या हाताला असलेल्या एका बोटाला मतदान मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी शाई लावली. यावेळी मतदान केंद्रावरील इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांना मतदान करताना मदत केली. यावेळी बोलताना सुरेखा कुडे म्हणाल्या "प्रत्येक मत हे अमूल्य असतं त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे" असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...