आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यकर्ते सुरेंद्र यांच्या हत्येत मोठा खुलासा, या दोघांसोबत सुरू होता वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी(उत्तर प्रदेश)- खासदार स्मृती इरानी यांच्या जवळचे असणारे बरौलिया गावचे माजी सरपंच सुरेंद्र प्रताप सिंह हत्याकांडाला एक नवीन वळन लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजकारणामुळे गावातील दोन व्यक्तींसोबत सुरेंद्र यांचा वाद होता. यात गावातील रामनाथ गुप्ता आणि 2015 मध्ये बीडीसी म्हणून नियुक्त झालेला रामचंद्र पासी. रामनाथ गुप्ता आपल्या भावाच्या मदतीने गावातील सरपंच पदावर बसायचे होते तर रामचंद्रलाही गावचा सरपंच बनायचे होते. लोकसभेत स्मृती इरानी यांच्या विजयानंतर शुक्रवारी सुरेंद्रने गावात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांचा बीडीसीसोबत वाद झाला होता.


जामोचे एसएचओ राजीव सिंहने सांगितले की, सुरेंद्र यांचे मोठे भाऊ नरेंद्र यांच्या तक्रारीनंतर बीडीसी रामचंद्र पासी, रामनाथ गुप्ता यांच्यासोबतच गावादील नसीम,वसीम अतुल सिंह ऊर्फ गोलू यांच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एसएचओने सांगितले की, तक्रारीनंतर पोलिसांचे एक पथक आरोपींना पकडण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच 17-18 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. लवकरच घटनेचा खुलासा केला जाईल.


सुरेंद्र यांच्या कुटंबासोबत भाजपचे 11 कोटी कार्यकर्ते आहेत. योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कायद्याच्या मर्यादेत राहून न्याय केला जाईल. हत्या करणारा पाताळातही लपला असले, तरी त्याला शोधून काढू. ज्याने गोळी चालवली आणि ज्याच्या सांगण्यावरून चालावली त्यांना फाशी देण्यासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत जाईल. 
स्मृती ईरानी, सांसद