आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तुम्ही पण आपल्या वडिलांप्रमाणे डान्सरचा स्वीकार करा\'; भाजप आमदाराचा राहुल गांधींना सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे ओळखले जाणारे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी अजून एक वादग्रस्त विधान केले आहे. हरियाणवी डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हे विधान केले. हे व्यक्तव्य करतांना त्यांनी सपना चौधरीची तुलना थेट सोनिया गांधीसोबत केली. पण एवढ्यावरच न थांबता त्यांना राहुल गांधींना सपना चौधरीला स्वीकारुन घेण्याचा सल्ला दिला. यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपण्याची शक्यता आहे. 

 


सोनिया गांधीं आणि सपनाची केली तुलना

प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीने सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुरेंद्र म्हणाल की, राहुल गांधी आपल्या घराची परंपरा पुढे नेत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्या आई सुद्धा इटलीत तेच काम करायच्या. त्यामुळे आता राहुल यांनी सपनालाही स्वीकारले आहे. असे वादग्रस्त व्यक्तव्य सुरेंद्र यांनी केले. पुढे बोलतांना त्यांनी राहुला गांधींना विचित्र सल्लाही दिला. ते म्हणाले की, 'राहुल यांचे वडील राजीव गांधी यांनी सोनियांना स्वीकारले तसेच तुम्हीही सपनाचा स्वीकार करून एका नवीन राजकीय पर्वाला सुरुवात करा. यासाठी तुम्हाला शुभेच्छा.'  


सुरेंद्र सिंहांच्या वादग्रस्त विधानानंतर ऐन निवडणुकांच्या काळात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...