आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरातीसंदर्भात सर्फ एक्सेलला विरोधाच्या नादात लोकांनी केला मायक्रोसॉफ्ट एक्सेललाही विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या  सर्फ एक्सेलच्या एका जाहिरातीला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. मात्र, एकसारखे नाव असल्यामुळे मायक्रोसॉफ्ट एक्सेललाही विरोध होत असल्याचे दिसत आहे.  

 
यासंदर्भात देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार, सर्फ एक्सेलने काही दिवसांपूर्वी एक जाहिरात प्रदर्शित केली होती. या जाहिरातीवर काही लोकांनी कडक शब्दांत आक्षेप घेत जाहिरातीला जाहीर विरोध दर्शवला होता. दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही जाहिरात तयार करण्यात आली असल्याचा आरोप त्या लोकांनी केला होता. त्यामुळे या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर सर्व सोशल मीडियावर म्हणजेच  ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर बायकॉट सर्फ एक्सेल हॅशटॅग असे अभियान सुरू झाले होते. व्हॉट्सअॅपवरदेखील या जाहिरातीच्या तसेच या उत्पादनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणातील पोस्ट फिरवण्यासाठी मोहीमच सुरू करण्यात आली होती.


विशेष म्हणजे हे प्रकरण इथेच संपले नाही. जगभरात प्रसिद्ध असलेली तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी मायक्रोसॉफ्टच्या एक्सेल नावाच्या उत्पादनाला विरोध करण्यात येत आहे. एक्सेल ही एक प्रकारची स्प्रेडशीट असून या शीटचा वापर सामान्यपणे हिशेब ठेवण्यासाठी, टेबल किंवा आलेख काढण्यासाठी करण्यात येतो.  केवळ एक्सेलचे विरोधक त्यांच्या मोबाइलवरील प्ले स्टोअरवर जाऊन एक्सेल नाव सर्च करतात. त्यामुळे सजेशनमध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेलदेखील येते. लोक मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील केवळ एक्सेलच्या संभ्रमामध्ये सिंगल स्टार रेटिंग देत आहेत. त्याखालील कॉमेंट बॉक्समध्ये हे उत्पादन हिंदूविरोधी असल्याचे लिहीत आहेत. 


हिंदुस्तान युनिलिव्हरने “रंग लाये संग’ या अभियानासाठी होळीवर हिंदू-मुस्लिम यांच्यात सद्भावना संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये एक मुलगी पूर्ण गल्लीमध्ये फिरून मुलांकडून स्वत:वर रंग लावून घेत असल्याचे दाखवले गेले आहे. ज्या वेळी सर्वांजवळील रंग संपतात, त्या वेळी ती तिच्या मुस्लिम मुलांजवळ जाऊन रंग संपले असल्याचे सांगते. त्यानंतर तो मुलगा त्या मुलीच्या सायकलवर बसतो आणि मुलगी त्याला मशिदीच्या दरवाजापर्यंत सोडते. 


हिंदुस्तान युनिलिव्हरच्या कुंभमेळ्यावरील जाहिरातीनंतरही झाला होता वाद 
या आधी हिंदुस्तान युनिलिव्हरची कुंभमेळ्याशी संबंधित रेड लेबल चहा उत्पादनाची जाहिरात आली होती. त्यावरही वाद झाला होता. यात एक युवक त्याच्या वडिलांना मुद्दाम कुंभमेळ्यामध्ये सोडून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. वास्तविक, त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाल्यानंतर तो पुन्हा त्यांच्या वडिलांच्या जवळ जातो, असे यात दाखवले होते. त्या ठिकाणी मुलगा परत येईल, असा विश्वास असलेल्या वडिलांनी दोन कप चहाची ऑर्डर दिलेली असते. ही जाहिरात हिंदू संस्कृतीच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...