आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेश झाल्यानंतरही साफ होत नव्हते व्यक्तीचे पोट, कोणत्याच औषधाचा होत नव्हता परिणाम, वेळेवर उपचार झाल्यामुळे वाचले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंघाई. चीनमध्ये गेल्यावर्षी एक विचित्र प्रकरण समोर आले. यामध्ये एका पोटदुखीची समस्या असणा-या व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात आले. तेव्हा त्याच्या पोटात 13 किलोची मांसाची गाठ निघाली. हे पाहून डॉक्टरही चकीत झाले. तपासणीदरम्यान कळाले की, या व्यक्तीला एक गंभीर आजार आहे. 5000 हजार लोकांमधून एकाला हा आजार असतो. 

 

लोकांना वाटले प्रेग्नेंट आहे
- शंघाईमध्ये राहणा-या 22 वर्षांच्या एका व्यक्तीसोबत ही घटना घडली. याला बालपणापासून बध्दकोष्ठतेची समस्या होती. औषध घेतल्याशिवाय त्याचे पोट साफ होत नव्हते. पण याचाही जास्त काही फायदा होत नव्हता. एकदा अचानक त्याच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. 
- अनेक वर्षांपासून बध्दकोष्ठतेची समस्या असल्यामुळे त्याच्या पोटाच्या आतील भागात भयंकर सूज आली होती आणि पोट फुगले होते. त्याचे पोट खुप जास्त फुगल्यामुळे लोक त्याला प्रेग्नेंट समजत होते, त्याच्या पुरुष असण्यावरही संशय घेत होते.

 

पोटातून निघाली 13 किलोची गाठ 
- वेदना सहन न झाल्यामुळे तो व्यक्ती स्वतःवर उपचार करण्यासाठी शंघाई येथील 10th पीपल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचला. येथे डॉक्टर यिन लु आणि त्यांच्या टीमने त्याच्यावर उपचार केले. 
- त्याच्या पोटात 30 इंच लाब काही तरी आहे असे आणि त्यामुळे त्याला वेदना होत आहे हे तपासणीदरम्यान कळाले. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन ते बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. 
- डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन केले तेव्हा व्यक्तीच्या मलाशयामध्ये 30 इंच लांब आणि जवळपास 13 किलोची एक गाठ मिळाली, ही गाठ विष्ठेची होती. दिर्घकाळ बध्दकोष्ठता असल्यामुळे ही गाठ तयार झाली होती.
- तीन तास सुरु असलेल्या ऑपरेशननंतर डॉक्टर म्हणाले की, ही गाठ एक जिवंत बॉम्ब बनली होती आणि कोणत्याही क्षणी फुटू शकली असती. असे झाले असते तर व्यक्तीला वाचवणे कठीण झाले असते.

 

यामुळे व्यक्तीला होती बध्दकोष्ठतेची समस्या 
- डॉक्टरांनुसार त्याला पोटाच्या एका दुर्मिळ आजारामुळे बध्दकोष्ठतेची समस्या होती. 
- त्याच्या आतडीमध्ये काही आवळ्यक कोशिका नव्हत्या. यामुळे त्याला शौच करताना समस्या होत होती. या आजाराचे नाव र्स्चस्प्रुंग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- हा आजार 5000 मुलांमधून एकाला होतो. बाळ आईच्या पोटात असते तेव्हा याची सुरुवात होते. बाळाचा जन्म झाल्याच्या दोन महिन्यानंतरच याचे लक्षण दिसू लागतात.
 

 

बातम्या आणखी आहेत...