आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 हजार किमी दूर बसलेल्या डॉक्टरने ५ जी नेटवर्कच्या मदतीने केली मेंदूची शस्त्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग । चीनमध्ये एका डॉक्टरने 3 हजार किलोमीटर दूर बसून पार्किन्सनने ग्रस्त झालेल्या रुग्णाच्या मेंदूची शस्त्रक्रिया केली. रोबोटच्या मदतीने केलेल्या या सर्जरीत ५ जी मोबाइल नेटवर्कचा वापर करण्यात आला.  जगात अशी पहिलीच शस्त्रक्रिया झाल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला.

 

रुग्ण बीजिंगच्या एका रुग्णालयात दाखल होता,तर शस्त्रक्रिया करणारे  डॉक्टर लिंग झिपेई ३००० किमीवरील हेनान प्रांताच्या सान्या शहरात होते. डॉक्टर झिपेईंनी सान्या येथूनच रोबोट आणि मशीन नियंत्रित केल्या. एका मोबाइल अॅपच्या मदतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली. यात ५ जी नेटवर्कची भूमिका महत्त्वाची ठरली, कारण इंटरनेटचा वेग चांगला असल्याने ‘रिअल टाइम ऑपरेशन’ शक्य झाले. पीपल लिबरेशन आर्मीचे सर्जन डॉ. झिपेई यांनी सांगितले की, ५ जी तंत्रज्ञानाने ४ जीत येणारा व्हिडिओ लॅग आणि  रिमोट कंट्रोल डिले या अडचणी दूर केल्या. त्यामुळे मेंदूचे प्रत्यारोपण सहजपणे झाले. शस्त्रक्रियेनंतर चांगले वाटत असल्याचे रुग्णाने सांगितले. 

 

ही शस्त्रक्रिया शनिवारी सुमारे ३ तास चालली. यादरम्यान रुग्णाच्या मेंदूत इलेक्ट्रोड लावले. डॉ. झिपेईंनुसार, या तंत्रज्ञानामुळे दूरवरच्या भागात न जाताच सहजपणे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करता येईल.  रुग्णांनाही मोठ्या शहरांत जाण्याची गरज भासणार नाही. पार्किन्सन आजार मेंदूच्या नसांना नुकसान झाल्याने होतो. मेंदूतून जाणारे सिग्नल अनियंत्रित होतात. त्यामुळे मांसपेशीत कठोरता येते. जगभरात तब्बल १ कोटींपेक्षा जास्त लोक या समस्येमुळे त्रस्त आहेत. मेंदूत प्रत्यारोपणानंतर रुग्ण स्वत:च आपल्या हालचाली नियंत्रित करू शकतो, त्याचबरोबर मांसपेशींचे कामकाजही सामान्यपणे होते. 

 

दूरवरच्या रुग्णांना आता मोठ्या शहरांत जावे लागणार नाही

डॉ. झिपेई म्हणाले की, 5 जी तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही लवकरच दूरवरील अनेक रुग्णावयांत शस्त्रक्रिया करू शकू. त्यामुळे स्थानिक रुग्णालयांतच रुग्णांना चांगले उपचार मिलू शकतील. 

 

बातम्या आणखी आहेत...