आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Surgery Of 4 Month Old Baby, 3 9 Mm Stones Extracted From Both Kidneys At Hyderabad Hospital

जगातील सर्वात लहान रुग्णाची झाली सर्जरी, दोन्ही किडनीतून काढले 8-9 एमएमचे 3-3 स्टोन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- प्रीती यूरोलॉजी अँड किडनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी 4 महिन्यांच्या बाळाच्या दोन्ही किडन्यांमधून 8-9 एमएमचे 3-3 स्टोन बाहेर काढले. सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने या सर्जरीला एकदम दुर्मिळ सर्जरी असल्याचे सांगितले. टीमने दावा केला आहे की, जगात पहिल्यांदाच त्यांनी 4 महिन्यांच्या बालाच्या दोन्ही किडन्यांची रेट्रोग्रेड इंट्रारीनल सर्जरी (एंडोस्कोपिक) केली आहे.
भारतात जास्त मीठ आणि नॉनवेज खाणाऱ्यांमध्ये डिहाइड्रेशनमुळे मुतखडा (स्टोन) आजार होतो. पण, लहान बाळांमध्ये हा आजार बहुदा होत नाही आणि नवजात बाळांमध्ये किडनी स्टोन होणे तर अशक्य आहे. डॉक्टर चंद्रा मोहन यांच्या टीममध्ये रेडियोलॉजिस्ट डॉ. पी. रूपा, यूरोलॉजिस्ट डॉ. रामकृष्ण, एनेस्थेटिस्ट डॉ. पवन आणि पीडियाट्रीशियन डॉ. अजय सामील होते.बाळाला लघवी करता येत नव्हती
मुतखडा असल्यामुळे बाळाला लघवी करताना त्रास होत होता. त्यामुळे निलोफर हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी बाळाला प्रिती यूरोलॉजी अड किडनी हॉस्पिटल रेफर केले. तिथे बाळाच्या पोटात मुतखडा असल्याचे निदान झाले. त्यानंतर रेट्रोग्रेड इंट्रारीनल सर्जरी(आरआयआरएस) केली. 

बाळांची अशी सर्जरी यूएस-चीनमध्यो होते
प्रिती यूरोलॉजी अँड किडनी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर वी. चंद्रा मोहन यांनी सांगितल्यानुसार, डॉक्टरांच्या टीमने जी सर्जरी केली आहे, तशा प्रकारची सर्जरी नवजात बाळासाठी दुर्मिळ आहे. बाळांसाठी अशाप्रकारच्या सर्जरीची सुविधा सध्या अमेरिकेत उपलब्ध आहे, पण जगात पहिल्यांदाच 4 महिन्यांच्या बाळाची आरआयआरएस झाली आहे.