आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात सर्जिकल स्ट्राइकचा थरार; प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - हेलिकाॅप्टरमधून उतरलेल्या जवानांनी थेट शत्रूवर हल्ला केला. यातून सर्जिकल स्ट्राइक कसे घडविले गेले, हे दाखविले. यातून प्रत्यक्ष युद्धाचा थरार शहरवासीयांना अनुभवायला मिळाला. जवानांनी हेलिकाॅप्टर, पॅराशूट, अश्व, दुचाकीसह इतरही प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनीही 'भारत माता की जय'चा जयघाेष करीत जवानांना प्राेत्साहन दिले.

 

सैन्य दलाच्या माध्यमातून राज्य राखीव पाेलिस दलाच्या मैदानावर 'देश के लिए लढाे, अागे बढाे' हा कार्यक्रम घेण्यात अाला अाहे. मैदानावर सैन्य साहित्याचे प्रदर्शन व दुपारी प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. त्यात सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात 'चित्ता' तीन हेलिकाॅप्टरने सलामी देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी हवेत कबुतर व फुगे साेडून कार्यक्रमाला अाैपचारिक सुरुवात केली. त्यानंतर मराठा रेजिमेंट जवानाच्या झांज पथकाने उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर प्रत्यक्ष युद्धभूमीवर हेलिकाॅप्टरच्या माध्यमातून सैन्य जवान जमिनीवर उतरून कशा प्रकारे शत्रू राष्ट्राच्या बंकरवर ताबा मिळतात याबाबत प्रात्यक्षिक सादर केले गेले.

 

त्यात एडवाइज हेलिकाॅप्टरच्या मदतीने अाठ जवान जमिनीवर उतरत त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर कशा प्रकारे युद्ध खेळले जाते. याचे प्रात्यक्षिक दाखविले. या वेळी गाेळीबाराचा अावाज केल्याने उपस्थितांना अापल्या डाेळ्यांनी युद्धभूमीवरील थरार अनुभवता अाला. शत्रू राष्ट्राचा बंकर ताब्यात घेतल्यानंतर जवानाने तिरंगा फडकविताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर दिवसभर प्रात्यक्षिके झाली.

 

शस्त्र,युद्धसामग्री पाहण्याची संधी
शस्त्रांच्या प्रदर्शनात बाेफाेर्स ताेफ, रणगाडा, ताेफा, विविध प्रकारच्या रायफली, ग्रेनाइड वाहून नेण्यासाठी असलेले वाहन तसेच जंगलात लपून शत्रू सैन्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे वाहन, रिमाेट कंट्राेलद्वारे नियंत्रण करता येणारे शस्त्र वाहन अादींची मांडणी प्रदर्शनात करण्यात अाली हाेती. ती पाहण्यासाठी शाळेचे विद्यार्थी साकळपासूनच मैदानावर उपस्थित झाले हाेते. विविध प्रकारची सैन्यसामग्री प्रथमच इतक्या जवळून पाहता अाली. या वेळी जवानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

शस्त्रांसाेबत सेल्फी घेण्याचा माेह अनावर
या प्रदर्शनात मांडण्यात अालेल्या रणगाडा, ताेफा व इतर साहित्यासमवेत अनेकांनी फाेटाेसेशन केले. दिवसभर अनेक जण या सामग्रीचे छायाचित्र अापल्या माेबाइलद्वारे फाेटाे काढून ते साेशल मीडियावर पाठवत असल्याचे दिसून अाले. सायंकाळच्या प्रात्यक्षिकांचेही अनेकांनी माेबाइलद्वारे चित्रीकरण केले. कार्यक्रमाला गर्दी झाल्याने अनेकांना उभे राहून तीन तास कार्यक्रम पाहावा लागला. तसेच नागरिकांचा उत्साह इतका हाेता की पाेलिसांना त्यांना अावरताना चांगलीच कसरत करावी लागली.

 

सर्जिकल स्ट्राइकचा देखावा
प्रदर्शनात पाकिस्तानातील अतिरेकी हल्ल्याबाबत दाेन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने पाकच्या हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राइक केले हाेते. त्याबाबतचा देखावाही प्रदर्शनात मांडण्यात अाला हाेता. कारगिल व सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी सैन्य दलातील जवानांकडून कसा हल्ला करण्यात अाला. याची माहिती या देखाव्यातून देण्यात अाली हाेती. तसेच शेजारी असलेल्या एलईडी टीव्ही संचावर सर्जिकल स्ट्राइकबाबत चित्रफीतही दाखविली जात हाेती. ही चित्रफीत यूट्यूबवरही उपलब्ध असल्याची माहिती याप्रसंगी विद्यार्थ्यांना देण्यात अाली. याच ठिकाणी मराठवाडा व महार रेजिमेंटचा एक स्टाॅल उभारण्यात अाला हाेता.

 

बातम्या आणखी आहेत...