आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकवर बेतलेल्या \'उरी\' फिल्मचा टीझर रिलीज, अंगावर शहारा आणतो टीझर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

18 सप्टेंबर 2016 रोजी काश्मीरमध्ये उडीच्या लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्यात देशाचे 19 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात 11 दिवसांनंतर दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राइक केला होता. या सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विक्की कौशल स्टारर चित्रपट 'उरी'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात यामी गौतम आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. 


टीझरमध्ये परेश रावल यांचा संवाद ऐकू येत आहे... त्यात ते म्हणत आहेत... 'हिंदुस्तान के आज तक के इतिहास में हमने कभी भी किसी दूसरे मुल्क पर पहला वार नहीं किया है। 1974, 65,71, 99। यही मौका है उनके दिल में डर बैठाने का कि हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा। ये नया हिंदुस्तान है..ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी'।. रॉनी स्क्रूवाला दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी 11 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...