आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2300 पर्यंत 50 फूट वाढेल समुद्रांची पातळी, अमेरिकेतील रुटगर्स विद्यापीठाच्या पाहणीतून समोर आला निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन - जगभरात हरितगृहे वायू उत्सर्जन असेच माेठ्या प्रमाणावर हाेत राहिल्यास जगातील सर्व समुद्रांची सरासरी जलपातळी सन २१०० पर्यंत अाठ फूट, तर २३०० पर्यंत ५० फुटांपर्यंत वाढू शकते. तसेच समुद्रांची जलपातळी वाढल्यास किनारपट्टी भागात राहणाऱ्या लाेकसंख्येसह पर्यावरणचक्राला माेठा धाेका निर्माण हाेऊ शकताे, असे एका पाहणीत अाढळून अाले अाहे. अमेरिकेतील रुटगर्स विद्यापीठाने ही पाहणी केली. 

 

याबाबत विद्यापीठाच्या संशाेधकांनी सांगितले की, शतकाच्या सुरुवातीनंतर जगभरातील समुद्रांच्या सरासरी पाणी पातळीत सुमारे ०.२ फूट वाढ झाली. विविध विश्लेषणांचा विचार करता उत्सर्जनामुळे २१०० पर्यंत समुद्रांची पातळी १.४ ते २.८ फूट, २१५० पर्यंत २.८ ते ५.४, व २३०० पर्यंत ६ ते १४ फूट वाढू शकते. समुद्र पातळीच्या ३३ फुटांपेक्षा कमी अंतराच्या भागात राहणाऱ्या जगातील ७.६ अब्ज लाेकांपैकी ११ % लाेकांसह किनारपट्टीजवळ राहणारी लाेकसंख्या, विविध अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा व पर्यावरणचक्राला यामुळे धाेका निर्माण झाला अाहे. तथापि, समुद्रांच्या जलपातळीत हाेणारी वाढ ही ठिकाण व वेळेनुसार वेगवेगळी असते. सन २००० ते २०५० पर्यंत जगातील समुद्रांची सरासरी पातळी शक्यतेपेक्षा ६ ते १० इंचांपर्यंत वाढू शकते; परंतु १८ इंचांपेक्षा जास्त वाढ हाेण्याची शक्यता खूप कमी अाहे, असेही संशाेधकांनी स्पष्ट केले. 

 

संशाेधकांनी विकसित केल्या विविध पद्धती 
समुद्रांच्या जलपातळीत वाढीमुळे निर्माण हाेणारा धाेका कमी करण्यासाठी हरितगृहे वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासह कठाेर उपाययाेजना करणे गरजेचे अाहे. या अभ्यासासाठी संशाेधकांनी अॅटलांटिक सिटी, न्यू जर्सी व सिंगापूर येथील पाहणीचा अाधार घेतला. हा धाेका टाळण्यासाठी संशाेधकांनी भविष्यातील प्रकल्पांच्या पुनर्निर्माणासाठी विविध पद्धती विकसित केल्या अाहेत. विसाव्या शतकात समुद्रांची जलपातळी वाढण्यास १९७५ पासून जागतिक लाेकसंख्यावाढीसह मानवनिर्मित ग्लोबल वाॅर्मिंग कारणीभूत अाहे, असे रुटगर्स विद्यापीठाचे प्रा.राॅबर्ट ई.कोप्प यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...