Home | Celebs | Celeb Photo Feature | Surveen Chawla shared her baby girl Eva's black and white photo on Instagram

सुरवीन चावलाने एक महिन्याच्या ईवासोबत केले फोटोशूट, इंस्टाग्रामवर शेअर केले फोटोज

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 11:59 AM IST

इटलीमध्ये जुलै 2015 मध्ये गुपचुप लग्न केले होते

 • Surveen Chawla shared her baby girl Eva's black and white photo on Instagram

  बॉलीवूड डेस्क - सुरवीन चावलाने नुकत्याच एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. तिने आपल्या मुलीचे नाव ईवा ठेवले आहे. सोमवारी तिने आपल्या मुलीचे फोटो शेअर केले. या फोटोत तिने मुलीला कुशीत घेतलेले दिसते आहे. सुरवीनने ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

  एका महिन्याच्या मुलीसोबत केले फोटोशूट

  सुरवीनने फोटो शेअर करत लिहिले 'हे तेच प्रेम आहे ज्याला मी ओळखलंय.' या फोटोत सुरवीन अतिशय सुंदर दिसतीये. तिने ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केलेला आहे. ती एक ग्लॅमरस आई दिसतीये. 15 एप्रिल रोजी तिने मुलीला जन्म दिला होता. आता एक महिन्याच्या मुलीसोबत तिचे पहिलेच फोटोशूट आहे.

  View this post on Instagram

  To love ...I know now.... @butnaturalphotography

  A post shared by Surveen Chawla (@surveenchawla) on May 13, 2019 at 1:43am PDT


  इटलीमध्ये केले होते लग्न

  सुरवीनने जुलै 2015 मध्ये बिझनसमन अक्षय ठक्करसोबत विवाह केला होता. या दाम्पत्याने इटली गुपचुप लग्न केले होते. कित्येक दिवस तिने आपले लग्न झाल्याचे लपवले होते. 2017 मध्ये आपल्या लग्नाचे फोटो शेअर तिने सर्वांनाच चकित करून सोडले होते. प्रेंग्नेसीच्या काळात ती सोशल मीडियावर अॅक्टीव होती. तिने प्रेंग्नेसीपासून ते डोहाळजेवणापर्यंतचे अनेक फोटो शेअर केले होते. सुरवीनने छोड्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक चित्रपट आणि वेब सिरीझमध्ये काम केले.

Trending