आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली बॉलिवूड अभिनेत्री, 6 महिन्यांची आहे प्रेग्नेंट, व्हायरल होत असलेला फोटो पासून सोशल मीडिया यूजर्स शॉक्ड, विचारले - ही विवाहित आहे का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. 6 महिन्यांची प्रेग्नेंट असलेल्या बॉलिवूड अॅक्ट्रेस सुरवीन चावलाने बेबी बंप फ्लॉन्ट करताना फोटो शेअर केला. फोटोवर तिने कॅप्शन लिहिले -  'And the official “BUMPIE”...🤰🏼... P.S.- I’ve started looking like the above emoji🤣🤪.' सुरवीनचा फोटो पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्स शॉक्ड आहेत. एकाने विचारले की, 'ही विवाहित आहे का?' तर दूस-याने विचारले की, 'तुमचे लग्न कधी झाले?' 
अशाप्रकारे इतर यूजर्सही प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही तिला शुभेच्छा देत आहेत 
- एका यूजरने कमेंट केली 'हे कधी झाले.' तर एकाने विचारले 'एवढ्या लवकर प्रेग्नेंट झाली' एका यूजरने शुभेच्छा देत सल्ला दिला की, 'डिलीवरीनंतर पुन्हा शेपमध्ये ये'

 

सुरवीनने केले होते सीक्रेट मॅरेज 
सुरवीनने 2015 मध्ये बॉयफ्रेंड ठक्करसोबत लग्न केले होते. रिपोर्टनुसार फिक्स्ड प्लानपुर्वीच त्यांनी कुटूंबाच्या उपस्थिती इटलीमध्ये लग्न केले. 2017 मध्ये तिने ट्विटरवर सर्वांना याची माहिती दिली होती. सुरवीन आणि अक्षय 2013 पासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची भेट कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. 


या टीव्ही शोमधून केले होत काम 
- सुरवीन पंजाबी सिनेमामधील एक मोठे नाव आहे आणि टॉप अॅक्ट्रेसमध्ये तिचे नाव आहे. 
- चंडीगढमध्ये तिचे बालपण गेले. तिने 2003 ते 2007 पर्यंत प्रसिध्द टीव्ही शो 'कही तो होगा' या मालिकेतून काम केले. 
- यानंतर ती 'कसौटी जिंदगी की'मध्ये श्वेता तिवारीच्या मुलीच्या भूमिकेत दिसली. लीड अॅक्ट्रेस म्हणून ती पहिल्यांदा सोनी इंटरनॅशनल चॅनलच्या फॅमिली शो 'काजल'मध्ये दिसली होती. 
- तिने 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार' नावाचा कॉमेडी शो होस्ट केला आहे. यासोबतच तिने डान्सिंग रियालिटी शो 'एक खिलाडी एक हसीना'मध्ये आपल्या डान्सची कला दाखवली होती. यामध्ये श्रीसंथ तिचा पार्टनर होता.


'हेट स्टोरी-2' मधून बॉलिवूडमध्ये घेतली एंट्री
- सुरवीनने 2014 मध्ये 'हेट स्टोरी-2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. यापुर्वी तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते.
- तिने ‘उंगली’ ( 2013), ‘क्रिएचर 3डी’ (2014), ‘वेलकम बैक’ (2015)सोबत अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.
- तिने 2011 मध्ये 'धरती' नावाच्या चित्रपटातून पंजाबी फिल्ममध्ये एंट्री घेतली होती. यासाठी तिला पीटीसी पंजाबी फिल्मच्या बेस्ट फीमेल डेब्यूचा अवॉर्ड देण्यात आला होता.
- पंजाबीमध्ये तिने 'तौर मित्रां दीं', 'शाडी लव स्टोरी', 'सिंह v/s कौर' आणि 'लकी दी अनलकी स्टोरी' सारखे चित्रपट केले होते.

 

कास्टिंग काउचला बळी ठरली आहे
- सुरवीन चावलाने 2016 मध्ये एक खळबळजनक खुलासा केला होता. सुरवीननुसार करिअरच्या सुरुवातीला तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
- सुरवीन सांगते की, साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.


 

बातम्या आणखी आहेत...