Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | survey of hawkers again by municipal corporation

महापालिकेतर्फे फेरीवाल्यांची पुन्हा पाहणी, आधीची वाया

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 09:35 AM IST

शिवाजी चौक, नवी पेठ या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून या भागासह इतर भागातील वाहतूक सेवा सुरळीत कर

 • survey of hawkers again by municipal corporation

  सोलापूर- शिवाजी चौक, नवी पेठ या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून या भागासह इतर भागातील वाहतूक सेवा सुरळीत करणे आणि फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारच्या चॅलेंजिंग फंडातून शहरासाठी सुमारे २.११ कोटी रुपये अनुदान असून, त्यातून फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून हाॅकर्स झोन निश्चित करणे, फेरीवाले निश्चित करणे ही कामे करायची आहेत. यासाठी महापालिकेने काम सुरू केले हाेते. पण ते काम अर्धवट राहिले. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षणाचे गुऱ्हाळ सुरू करण्यात आले आहे.


  रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले उभे राहात असल्याने वाहनांना ये-जा करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच अतिक्रमणाचे प्रकारही वाढले आहेत. फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्याच्या उद्देशाने त्यांची पाहणी करण्यात येत आहे.

  शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम यापूर्वी सुरू केले होते. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार सुमारे ९ हजार ५११ जणांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने काम सुरू केले. सुमारे एक हजार जणांचा सर्व्हे करून त्यापैकी काहीजणांना कार्डही वाटप केले. काम अर्धवट थांबले.


  अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत काम करण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथील ओयासीस टेक्नाॅलाॅजी यांना काम दिले. सहा महिन्यांत काम पूर्ण करणे आहे. मोबाइल अॅपद्वारे आॅनलाइन सर्व्हे करून काम करणे आहे. अॅपला तांत्रिक अडचण शासनामार्फत आल्याने त्याबाबत महापालिका अधिकारी शासनाकडे पाठपुरावा केला. आठ दिवसांत आॅनलाइन अॅप सुरू होईल आणि काम सुरू होईल, असे सांगण्यात आले. याबाबत प्राथमिक बैठक महापालिकेत झाली. या वेळी उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, एनयूएलएमचे वैशाली आवाड, मुजाहिद बागवान, खाजासाब करजगी, मनपा मंडई अधीक्षक ए. ए. चाँदा आदी उपस्थित होते.


  काय होतील फायदे व तोटे?
  शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यावरून नागरिकांत असंतोष असून आंदोलन करण्यात येत आहे. फेरीवाले सर्वेक्षण वेळेत करून पूर्ण काम केले असते तर वाहतूक सेवा सुरळीत होण्यास मदत झाली असते. शिवाजी चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते. नवी पेठेत फेरीवाल्यांमुळे चालणे जिकिरीचे झाले. दुकानासमोर फेरीवाले उभा राहत असल्याने व्यापाऱ्यांवर परिणाम होतोय. शहरातील वाहतूक सेवा सुरळीत होईल. रस्त्यावर होणारे अतिक्रमण थांबेल, सर्वसामान्यांना व्यवसाय करण्यास उपयोगी होईल.


  पूर्वीचे काम अर्थवट
  फेरीवाले धाेरण व चॅलेंज फंड योजनेंतर्गत आराखडा करण्यासाठी केंद्र सरकारकडून १८ लाख रुपये आले होते. यासाठी सातारा येथील संस्थेस काम दिले. पण अर्धवट राहिले व तांत्रिक अडचणीमुळे काम अर्धवट सोडून गेले. पुन्हा नव्याने काम सुरू करण्यात आले आहे.


  या भागात होते नियोजन
  अासार मैदान, कस्तुरबा मार्केंट, चिप्पा मार्केट, रंगभवन, शिवाजी चौक आदी ठिकाण.


  शासनाच्या योजना अर्धवट
  केंद्र सरकारचे अमृत योजना, पाणीपुरवठा, फेरीवाले धोरण, चॅलेंज फंड, उद्यान विकास आदी कामे अर्धवट राहिले आहेत.


  माहिती देण्याचे आवाहन
  यापूर्वी १०४३ फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला असले तरी पुन्हा नव्याने सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी माहिती द्यावी.
  - त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त, महापालिका

Trending