आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेषपासून मीनपर्यंत : वृश्चिक राशीतील सूर्यामुळे कोणत्या लोकांना मिळेल भाग्याची साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 ला सूर्य तूळ राशीमधून वृश्चिक राशीत आला आहे. या राशीमध्ये आधीपासून गुरु आणि बुध ग्रह स्थित आहेत. सूर्य वृश्चिकमध्ये आल्यामुळे गुरु अस्त झाला आहे. सूर्य 16 डिसेंबरपर्यंत याच राशीमध्ये राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्याच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर प्रभाव राहील. येथे जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या सूर्याचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल...


मेष - सध्या नुकसान होऊ शकते. काही दिवसानंतर काळ बदलेल. सर्व कार्य वेळेवर पूर्ण होऊ लागतील. उत्पन्नही चांगले राहील. एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याची संधी मिळेल.


वृषभ - सध्याचा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. उत्पन्नात वृद्धी होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सुविधाही प्राप्त होतील. परंतु खर्च जास्त राहील. घरामध्ये वाद होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.


मिथुन - तुमच्यासाठी काळ चांगला आहे परंतु अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. संयम राहावे. अडकलेले धन प्राप्त होण्याचा योग आहे. सरकारी कामामध्ये बाधा आल्या तरी यश प्राप्त होईल.


कर्क - आता तुमच्या वाईट काळात सुधार होईल. उत्पन्न चांगले झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. फिरायला जाण्याची संधी मिळेल. उत्तम व्यवस्थेमध्ये कामाची सुरुवात होईल. नवीन कामे मिळतील.


सिंह - सध्या सावध राहावे नुकसान होऊ शकते. खर्चही जास्त होण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास होऊ शकतो. काही दिवसानंतर काळ बदलेल. उत्पन्न वाढेल आणि नवीन कामही मिळेल.


कन्या - तुमच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम राहील. सर्वांची मदत मिळेल आणि उपन्नही वाढेल. योजना यशस्वी होतील. काही दिवसानंतर समस्या निर्माण होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसे राहील सूर्याचे राशी परिवर्तन...

बातम्या आणखी आहेत...