आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सूर्यवंशी’ आणि ‘83’चे प्रदर्शन ढकलले पुढे, सेलिब्रिटींचे दौरे आणि ट्रेलर लॉन्चदेखील झाले रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर टांगती तलवार आहे. तर, दुसरीकडे कमी बजेटवाल्या चित्रपटासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. बॉलिवूड खूप सतर्क झाले आहे. यामुळेच बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. तर, काही सेलेब्सने त्यांच्या सहलीदेखी रद्द केल्या आहेत. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ अभिनित ‘सूर्यवंशी’ आणि कबीर खान दिग्दर्शित ‘83’ ची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. ‘सूर्यवंशी’ २४ मार्च रोजी, तर ‘83’ १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. कबीर खानने ‘83’च्या प्रदर्शनापूर्वी एका मोठ्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाचे आयोजन केले होते , परंतु ते आता रद्द करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ११ मार्च रोजी होणार होता. कोरोना व्हायरसमुळे एकाच ठिकाणी एकत्र न येण्याचा सल्ला दिला असल्यामुळे निर्मात्यांनी ट्रेलर लाँचचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनामुळे ‘83’ चा ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द, कमी बजेटच्या चित्रपटांवरही होतोय परिणाम... 

एक कमी बजेटचा चित्रपट ‘कार्गो’ची दिगदर्शिका आरती कडव म्हणाली... ‘आमच्या चित्रपटाची अमेरिका, ब्राझील, आस्ट्रेलिया, लंडनसह एकूण १५ फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी सहा वर्षे लागलीत. एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आम्हाला ऑक्टोबरची तारीख दिली होती. परंतु, कोरोनामुळे असे वाटते फेस्टिव्हलच पुढे ढकलला जाऊ शकतो. एक फेस्टिव्हल केरळमध्ये आहे, परंतु तेथे चित्रपटगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त परीक्षकांना चित्रपट दाखवला जाणार आहे. लवकरात लवकर जगभरातून कोरोनाचे संकट दूर होईल, अशी आशा आहे.’

रिलायन्स एंटरटेनमेंटचे सीईओ शिबाशीष सरकार म्हणाले,  ‘याबाबत राेज चर्चा होत आहे, परंतु आतापर्यंत काही निर्णय घेतला नाही. अद्यापतरी चित्रपटांच्या रिलीज डेट त्याच आहेत ज्याची पूर्वी घोषणा केली होती. प्रथम ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होईल, म्हणून जो काही निर्णय होईल तो अगाेदर ‘सूर्यवंशी’बाबत होईल. त्यानंतर ‘83’च्या बाबत विचार करण्यात येईल. मात्र, दोन्ही चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकलाव्या लागल्या तरी काळजीचे कारण नाही. यामुळे काही विशेष परिणााम होणार नाही. हळूहळू परिस्थिती सामान्य होईल आणि कोणत्याही चित्रपटाची रिलीज डेट बदलावी लागणार नाही अशी अपेक्षा आहे. केरळ आणि जम्मूमधील चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. हे आमच्यासाठी एक आव्हानच आहे. जगभरात याचा १५-२० टक्के परिणाम झाला आहे. जर तुम्ही ५० दशलक्ष डॉलरच्या व्यवसायाची अपेक्षा करता तर ४० दशलक्ष डॉलरच मिळणार हे लक्षात ठेवावे लागेल. चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...