आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी' चे रिलीज टाळले गेले आहे. चित्रपट 24 मार्चला रिलीज होणार होता, पण आता कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी टाळला गेला आहे. याची माहिती देत अक्षय कुमारने रोहित शेट्टी प्रोडक्शनची नोट जारी करत लिहिले, कारण सुरक्षा नेहमी सर्व प्रथम असते, तुम्ही सर्व सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या.
चित्रपटाचा डायरेक्टर रोहित शेट्टीने प्रोडक्शन हाऊसच्या वतीने स्टेटमेंट जारी केले ज्यामध्ये लिहिलेले आहे, 'सूर्यवंशी' एक असा चित्रपट आहे, जो आम्ही अनेक वर्षांच्या मेहनतीने आणि अगदी मनापासून बनवला आहे. याच्या ट्रेलरला ज्याप्रकारचा रिस्पॉन्स मिळाला ते उत्तम होते. ज्याने हे सिद्ध झाले की, हा चित्रपट पूर्णपणे प्रेक्षकांना समर्पित आहे.
आम्ही हा चित्रपट सादर करण्यासाठी तितकेच उत्साहित आहोत जेवढे तुम्ही सर्व पाहण्यासाठी आहात. पण अशातच कोरोना व्हायरस पसरल्यामुळे आम्ही प्रेक्षकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन 'सूर्यवंशी' ची रिलीज डेट पोस्टपोन करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सूर्यवंशी' तुमच्यासमोर तेव्हा येईल जेव्हा योग्य वेळ असेल. कारण सुरक्षा सर्वात जास्त गरजेची आहे. तोपर्यंत उत्साह असाच राहू द्या, आपली काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा. आपण यातूनही पुढे जाऊ. - टीम 'सूर्यवंशी'
करण जोहरने केले ट्वीट...
चित्रपटाचा प्रोड्यूसर करण जोहरनेदेखील 'सूर्यवंशी'च्या टीमच्या स्टेटमेंटला ट्वीट करत लिहिले, 'आपण चित्रपटांद्वारे तेव्हा भेटू जेव्हा योग्य वेळ असेल. तोपर्यंत सुरक्षित राहा.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.