आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अॅक्टर सुशांत सिंहच्या लहान बहिणीला झाला गंभीर आजार, सोशल मीडियावर मागतोय मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेला अॅक्टर सुशांत सिंह आयुष्यातील वाईट काळाचा सामना करतोय. त्याची लहान बहीण सोफिया न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसारख्या आजाराचा सामना करतेय. सुशांतने आपल्या बहिणीवर उपचार केले परंतू या आजारावर फक्त एकच उपचार आहे आणि ते करुनही ती बरी होऊ शकत नाहीये. यामुळे सुशांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत मागितली आहे. 

 

केले इमोशनल ट्वीट 
- सुशांतने ट्विटरवर आपल्या बहिणीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, "मित्रांनो अपील आहे. माझी लहान बहीण सोफिया न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (CDIP) चा सामना करतेय. हे एक ऑटो इम्यून डिसऑर्डर आहे आणि यावरील उपचार यशस्वी होऊ शकत नाहीये. प्लीज हे रीट्वीट करा आणि एका योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा जो आमची मदत करेल."
- सुशांतच्या या ट्वीटला आतापर्यंत 12 हजारांपेक्षा जास्त लोकांनी रीट्वीट केले आहे. तर अनेक लोक त्याच्या मदतीसाठी पुढेही आले आहेत.
- सुशांतचे हे ट्विटर अकाउंट व्हॅरिफाइड नाही. परंतू लोक आपल्याकडून सुशांतची मदत करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहेत.
- काही यूजर्सने त्याला वेगवेगळे डॉक्टर्स आणि हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीचे चेकअप करण्याचा सल्ला दिला आहे. 

 

या चित्रपटांमध्ये केले आहे काम 
सुशांत सिंहच्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये आलेल्या 'सत्या' मधून झाली. यानंतर त्याने  'जंगल', '16 दिसंबर', 'दम', 'डरना मना है', 'बेबी', 'ये साली जिंदगी', 'हेट स्टोरी 2' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो शेवटच्यावेळी 2017 मध्ये आलेल्या 'लिपस्टिक अंडर माय बुर्का'मध्ये दिसला होता. सध्या त्याच्याजवळ कोणत्याही चित्रपटाची ऑफर नाही. तो सध्या स्टार भारतवर 'सावधान इंडिया' हा शो होस्ट करतोय.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...