आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushant Singh Rajput Adds New Clause To Contract, He Will Sing Film Only If It Will Be Release In Theatre

सुशांत सिंह राजपूतने काँट्रॅक्टमध्ये जोडले नवीन क्लॉज, चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्याच्या शाश्वतीवरच साइन करणार चित्रपट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सुशांत सिंह राजपूत आपला चित्रपट 'ड्राइव्ह' चित्रपट गृहात रिलीज न करता डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यामुळे वाईट वाटले आहे. त्याच्या एका जवळच्या सूत्राने याची माहिती दिली आहे. त्याचे म्हणणे आहे की, सुशांतने हा चित्रपट केवळ डिजिटल रिलीजसाठी साइन केला नव्हता. चित्रपट केवळ डिजिटलवरच रिलीज झाल्यामुळे ब्रँड व्हॅल्यू प्रभावित होते. त्यामुळे आता सुशांत जेही चित्रपट साइन करत आहे. त्यामध्ये एक स्पेशल क्लॉज टाकत आहे.  

चित्रपटगृहात रिलीजची गॅरंटी मागत आहे सुशांत... 
सुशांत या स्पेशल क्लॉजमध्ये मेकर्सला ही गॅरंटी मागत आहे की, ते चित्रपट चित्रपटगृहातच रिलीज करतील. जे मेकर्स यानुसार करार करत आहेत. त्यांच्यासोबत तो वेगवेगळ्या पद्धतीने डील करत आहे आणि जे असे करत नाहीयेत, त्यांच्यासाठी त्याच्याकडे वेगळ्या अटी आहेत. यासंदर्भात जेव्हा आम्ही त्याच्या टीमला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा 'नो कमेंट' असे उत्तर मिळाले. 

आणखी एका चित्रपटाबद्दल तयार होत होती डिजिटलवर रिलीज होण्याची परिस्थिती...  
'ड्राइव्ह' व्यतिरिक्त सुशांतचा आगामी 'दिल बेचारा' चित्रपटासोबतही डिजिटल रिलीजच्या शक्यता निर्माण होत होत्या. यामुळे तो नाराज होता. फायनली मेकर्सने याची थिएट्रिकल रिलीज डेट (8 मे 2020) अनाउंस केली. 

बातम्या आणखी आहेत...