आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushant Singh Rajput Will Now Become Fine Arts Student After Engineering And Hijacking A Plane In Film

इंजीनियरिंगनंतर आता फाइन आर्ट््सचा विद्यार्थी बनणार सुशांत सिंह राजपूत; करणार विमानाचे अपहरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः खऱ्या जीवनात इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या सुशांतसिंह राजपूतने मागच्या 'छिछोरे' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाची पार्श्वभूमी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवरच आधारित होती. आता तो पुन्हा एकदा विद्यार्थ्याची भूमिका साकारणार आहे. या नाव न ठरलेल्या चित्रपटात तो फाइन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन संजय पूरन सिंह करणार आहेत. मात्र याविषयी अजून अधिकृत घोषणा झाली नाही.

लखनऊ विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांची कथा...
हा चित्रपट 90 च्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही कथा लखनऊ विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांभोवती फिरते. ज्यांनी आपल्या मागण्यांसाठी एका विमानाचे अपहरण केले होते. नोकरी मिळवण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात जोडावा अशी मागणी त्यांनी केली होती. पुढे त्या विद्यार्थ्यांचे काय झाले यावर चित्रपट आधारित आहे.

'चंदा मामा दूर के'वर सुरू आहे काम...
या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पूरन सिंह चौहानसोबत सुशांतचा आणखी एक स्पेस जॉनरचा 'चंदा मामा दूर के' येणार होता. या चित्रपटावर संशोधनासाठी संजयने सात वर्षे लावले. बॉलीवूडमध्ये अंतराळावर आधारित पहिल्या चित्रपटाची घोषणादेखील त्यांनीच केली होती. त्यानंतर इतर निर्मात्यांचे लक्ष याकडे वळले. सूत्रानुसार, सुशांत अजूनही या चित्रपटावर काम करत आहे. कारण तो संजयची इतक्या वर्षांची मेहनत वाया जाऊ देणार नाही.

7 वर्षांनंतर सोबत काम करणार ऋषी....
संजय या चित्रपटाचे निर्माते आणखी एक मजेदार चित्रपट घेऊन येणार आहेत. यात ऋषी कपूर आणि संजय दत्त 7 वर्षानंतर सोबत काम करणार आहेत. 2012 मध्ये दोघांचा 'अग्निपथ' आला होता, त्यात ते एकत्र दिसले होते. या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले, तर यात ऋषी कपूर पंडित होणार आहे आणि संजय दत्त पठाणची भूमिका साकारणार आहे. संजय एका महिन्यापासून सुटीवर होता. नुकताच तो मुंबईला आला आहे. आता त्याची आणि ऋषीची तारीख पाहिली जात आहे, त्यानंतर या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. जानेवारीत शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.