आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushant Singh Rajput's Get Replaced From The Movie, Now Enters 'Love Sex And Dhoka' Fame Anshuman Jha

चित्रपटातून सुशांत सिंह राजपूतचा पत्ता कट, 'लव्ह सेक्स और धोखा' फेम अंशुमन झा याची एंट्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'लव्ह सेक्स और धोखा' फेम अंशुमन झा याला एका चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूतच्या जागी घेण्यात आले आहे. पंकज दुबेची कादंबरी 'लूजर कहीं का'ची कथा आहे. याचा हिरो बिहारचा असतो. तो बेगुसरायमधून दिल्ली विद्यापीठामध्ये येतो. त्याचे आयएएस बनण्याचे स्वप्न असते. मात्र तो एक पंजाबी मुलीच्या प्रेमात पडतो.

नंतर तो विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत सहभागी होतो. यानंतर त्याच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा येतो, हे सर्व चित्रपटात दाखवले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमातील नायकाची भूमिका सुशांतसिंग राजपूत साकारणार होता, कारण तो बिहारचा आहे. मात्र, आता अंशुमन झा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. दिग्दर्शन पंकज दुबे करणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारीपासून या चित्रपटाचे काम सुरू होईल. अंशुमन सध्या त्याच्या आईची देखरेख करत आहे. त्याच्या आईला कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस तो भूमिकेची तयारी सुरू करणार आहे. 'हम भी एक तुम भी अकेले' चित्रपटाचे शूट पूर्ण झाल्यापासून तो ब्रेकवर होता.