आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टोकियो- जगात १०० हून अधिक वयापर्यंत जगणाऱ्यांत जपानी लोकांची संख्या सर्वाधिक आहे. शुक्रवारी जपानमधील नॅशनल कॅन्सर रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी या दीर्घायुष्यामागील रहस्य जाहीर केले. सुमारे १ लाख लोकांवर १५ वर्षे केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष आधार मानून शास्त्रज्ञांनी सांगितले की, या दीर्घायुष्यामागे सुशी आणि सूपसोबत मिसो पेस्ट तसेच नेटोचे सेवन हे रहस्य आहे. हे पदार्थ सोयाबीनपासून तयार केले जातात. या उत्पादनांत विगन टोफू आणि पारंपरिक मिसो, व्हिनेगार आणि मीठ याचा वापर करून तयार केलेला सुशी, सूप यांचा समावेश आहे. याच्या सेवनाने शरीर तरुण राहण्यासाठी आवश्यक असलेल्या पेशी नष्ट होत नाहीत.
या आहारात फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक आढळते. हेच दीर्घायुष्याचेही रहस्य आहे. या संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक मिसो आणि नेटोचे सेवन करत होते त्यांच्या अकाली मृत्युची शक्यता इतरांच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी होती. शास्त्रज्ञांच्या मते, या पदार्थांमध्ये फायबर व पोटॅशियमसोबत असलेले इतर घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात. जपानमध्ये लोक साधारणपणे सरासरी ८४ वर्षे जगतात. आयुष्याची ही सरासरी जगात सर्वाधिक आहे. बहुतांश जपानी लोक सकाळी सर्वप्रथम मिसो सूप पितात. शास्त्रज्ञांनुसार जपानमध्ये केवळ आहारच नव्हे, तर स्वच्छता आणि व्यायामाकडेही लोक लक्ष देतात. एखादे पुस्तक कुणी ग्रंथालयात परत केले तर ते युव्ही तंत्राने स्वच्छ केले जाते. जेणेकरून त्यावरील विषाणू इतरांमध्ये संक्रमित होऊ नयेत. हसत जगणे या लोकांना आवडते, ही दिनचर्या त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य ठरते.
८७% लोकांनी भूक असूनही कमी अन्न घेतले, मीठही कमीच
शास्त्रज्ञांनी ४५ ते ७४ वर्षांचे ४२,७५० पुरुष आणि ५०,१६५ महिलांचा रोजचा आहार व खाण्याच्या सवयींचा अभ्यास केला. यादरम्यान १३,३०३ जणांचा मृत्यू झाला. ९९% लोक भोजनात भाज्या व डाळींचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे आढळले. यातील ८७% लोक असे होते की, भूक असूनही ते नेहमी कमी आहार घेत होते. सोबत मिठाचा वापरही ते अत्यंत कमी करत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.