कुस्ती / आठ वर्षांनंतरचे सुशीलचे पुनरागमन सहा मिनिटांत अपयशी

सुशीलची ट्रायल ठरली हाेती वादग्रस्त 

वृत्तसंस्था

Sep 21,2019 09:51:00 AM IST

नूर सुलतान - दाेन वेळच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू सुशीलकुमारचे तब्बल आठ वर्षांनंतर जागतिक स्पर्धेतील पुनरागमन अपयशी ठरले. त्याला स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याचा ७४ किलाे वजन गटाच्या सलामीलाच पराभव झाला. त्याला अवघ्या सहा मिनिटांत पॅकअप करावे लागले.


भारताच्या अनुभवी आणि सीनियर कुस्तीपटू सुशीलकुमारला शुक्रवारी अझरबैजानच्या खेदजदीमुरादविरुद्ध पहिल्याच फेरीत पराभवाला सामाेरे जावे लागले. अझरबैजानच्या मल्लाने ११-९ अशा फरकाने सलामीला विजयाची नाेंद केली. या लढतीत सुशीलकुमारने दमदार सुरुवात करताना ९-४ ने आघाडी घेतली हाेती. मात्र, त्यानंतर अझरबैजानच्या खेदजदीमुरादने ७ गुणांची कमाई करून सामना आपल्या नावे केला. दरम्यान, या मल्लाला आपल्या वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.


सुशीलची ट्रायल ठरली हाेती वादग्रस्त
- सुशीलकुमारने गत महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ट्रायल दिली हाेती. मात्र, त्याचा या निवड चाचणीमधील सहभाग वादग्रस्त ठरला हाेता. सुशीलने पात्रता फेरीत जितेंद्रचा ४-२ ने पराभव केला हाेता. मात्र, यादरम्यान त्याने मेडिकल टाइम घेतल्याचा आराेप जितेंद्रचे काेचने केला हाेता. त्यानंतर सुशीलची या स्पर्धेसाठी संघात निवड झाली हाेती.
- गत वर्षी साल कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या ट्रायलमध्ये सुशील कुमारचा सामना प्रवीण राणाशी हाेणार हाेता. मात्र, या लढतीपुर्वी दाेन्ही मल्लांचे चाहते समाेरासमाेर भिडले हाेते. यादरम्यानही प्रवीणने सुशीलची संघात थेट स्थान दिला असल्याचा आराेपही केला हाेता.


सुमीत, करणचाही पराभव; सलामीलाच चितपट
सुमीत मलिक आणि करणचेही आव्हान संपुष्टात आले. सुमीतचा १२५ किलाे वजन गटाच्या पहिल्याच लढतीत हंगेरीच्या डॅनियल िलगेटीकडून पराभव झाला. लिगनेीने २-० ने सामना जिंकला. दुसरीकडे करणला ७० किलाे वजन गटाच्या पहिल्याच फेरीत उझबेकिस्तानच्या इखतियाेरने पराभूत केले. त्याने ७-० ने एकतर्फी विजयाची नाेंद केली.

X
COMMENT