आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज 4 (सप्टेंबर) वाढदिवस. सुशिलकुमार शिंदे यांनी राजकारणातून संन्यास घेतला असला तरी त्यांची कन्या प्रणीती शिंदे त्यांनी त्यांचा वारसा पुढे सुरु ठेवला आहे. प्रणीती या वयाच्या 28 व्या वर्षी (2009) मध्ये पहिल्यांदा आमदार बनल्या होत्या.
सुशिलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्यासाठी प्रणीती शिंदे आणि नातू वीर पहरिया याच्याविषयी रोचक माहिती घेऊन आलो आहे.
कन्या आमदार तर नातू दुबईत घेतोय उच्चशिक्षण...
- सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीचे नाव उज्ज्वला असून त्यांना तीन कन्या आहेत. (प्रणीती, प्रीती, स्मृति) प्रीती आणि स्मृति या दोघींचा विवाह झाला असून राज श्रॉफ आणि संजय पहरिया अशी जावईंची नावे आहेत.
- शिंदे यांची कन्या प्रणीती या सोलापूरच्या आमदार आहेत. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरिया आणि सैफ अली खानची कन्येचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती.
कोण आहे प्रणीती?
- प्रणीती या सोलापूरच्या आमदार आहेत.
- प्रणीती या एका सामाजिक संस्थेच्या फाऊंडर आहेत. तसेच त्या सामाजिक संघटना जय जुई फाउंडेशनच्या संस्थापकही आहेत.
- ही संस्था खासगी कंपन्यांशी संपर्क करून होतकरु सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळवून देते.
- प्रणीती यांनी एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिली होती.
- प्रणीती लहानपणापासून वडीलांसोबत राजकीय कार्यक्रमात सहभाग घेत होत्या.
प्रणीती आहेत कायदेतज्ज्ञ..
- प्रणीती शिंदे या कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांनी सेंट जेव्हिअर कॉलेज मुंबईतून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट येथून वकीलीचे शिक्षण घेतले आहे.
कोण आहे वीर?
- वीर हा सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृति यांचा मुलगा आहे. तो सध्या दुबईत शिक्षण घेत आहे. पॉप स्टार व्हायचे त्याचे स्वप्न आहे.
- वीर आणि सैफची कन्या (अमृताची मुलगी) सारा डेट करत असल्याची चर्चा आहे.
- वीर आणि सारा ही जोडी पार्टीत कायम दिसते. काही दिवसांपूर्वी दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात वीर, साराला KISS करताना दिसत होता.
- दोघांनी परस्पर साखरपुडा उरकून घेतल्याचेही वृत्त होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... प्रणीती शिंदे आणि वीर पहरियाचे निवडक फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.