आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - काँग्रेस व राष्ट्रवादी आज जरी वेगळी असली तरी पूर्वी एकाच झाडाखाली वाढलेली आहे. आता आम्ही दोघेही थकलेले आहोत. आम्ही दोघे एका आईच्या मांडीवर वाढलो आहोत. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व घेऊन पुढे आलो. आमच्याही मनात खंत आहे, त्यांच्याही मनात खंत असेल, पण ते कधीच स्पष्ट बोलून दाखवत नाहीत. वेळ येईल त्या वेळेस ते निर्णय घेतील, पण त्याची सुरुवात आज सोलापुरातून झाली असल्याचे सांगत भविष्यात काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. शहर उत्तरचे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन मंगळवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिंदे म्हणाले, पवार आणि माझ्या मैत्रीत अनेकांनी घोळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये यश आले नाही. कसे वागावे आणि कसे डावपेच करावेत याची शिकवण पवारांनीच दिली. सामाजिक कार्यकर्ता नगरसेवक बाबा मिस्त्री यांना सोलापूर दक्षिणची उमेदवारी दिली आहे. मिस्त्री यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
सपाटेंना पवारांनी दिली संधी...
शहर उत्तरची जागा काँग्रेसकडे असल्याने सुदीप चाकोते, प्रकाश वाले या नावाचा विचार केला. जागा वाटपाची समितीकडून यावर बराच खल झाला. तुम्ही काँग्रेसमध्ये येणार असेल तर ती जागा तुम्हाला देऊ असेही मी सपाटे यांना म्हणालो, पण त्यांनी मी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. अखेर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आणि ही जागा मनोहर सपाटे यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.