Home | Gossip | sushimta sen decided to take back her entry form from miss univars because of aishwarya rai

जेव्हा ऐश्वर्या रायचे नाव ऐकून मिस यूनिवर्सचा एंट्री फॉर्म परत करणार होती सुष्मिता सेन, पण ऐकून घेतला होता निर्णय आणि मिळवले होते विजेतेपद   

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 10:59 AM IST

एका प्रश्नावर दिलेल्या चुकीच्या उत्तरामुळे मिस इंडिया यूनिवर्स होता होता राहिली ऐश्वर्या... 

 • sushimta sen decided to take back her entry form from miss univars because of aishwarya rai

  मुंबई : सुष्मिता सेनने 'कॉफी विद करण' मध्ये 2005 मध्ये सहभाग घेतला होता. त्यादरम्यान तिने मिस यूनिवर्सशी निगडित एक खुलासा केला होता. तिचे म्हणणे होते, "ऐश्वर्या रायचे मिस यूनिवर्ससाठी नाव ऐकून मी हैरान झाले होते आणि एंट्री फॉर्मदेखील परत देणार होते. मला वाटायचे ती एवढी सुंदर आणि उंच आहे, तर लोकांना मी का आवडेना. पण यासाठी मी माझ्या आईचे आभार मानेन कारण त्यांनी मला हा निर्णय घेऊ दिला नाही."

  अभिनेत्रीच्या आईने सांगितले हे...
  सुष्मिता सेनने पुढे सांगितले, "माझ्या आईने मला तू हरलीस तरी मला चालेले, पण असे नको संजूस की, ऐश्वर्याच्या येण्यामुळे आता यावर्षी कुणालाच संधी नाही. एवढे ऐकून मी तयार झाले आणि आईसाठी या स्पर्धेत सहभागी झाले आणि जिंकलेही, जे माझ्यासाठी हैरान करणारे होते."

  मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्याला हरवले होते...
  मिस यूनिवर्सची पदवी मिळण्याआधी सुष्मिता सेनने ऐश्वर्या रायला हरवले होते. असे केवळ एका उत्तरामुळे झाले होते. झाले असे की, दोघीनाही एक प्रश विचारला गेला होता. जर तुम्ही एखादी ऐतिहासिक घटना बदलू शकला असतात तर ती घटना कोणती असती ? यावर ऐशचे उत्तर होते "माझ्या जन्माची वेळ" पण सुष्मिता म्हणाली, "इंदिरा गांधी यांचा मृत्यु." या उत्तराने सुष्मिताने ती स्पर्धा आणि सर्वानाच मनही जिंकले.

Trending