आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपाननंतर आता सुषमा, निर्मला यांची अाज अमेरिकेशी टू प्लस टू चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत आणि अमेरिका यांच्यात प्रथमच गुरुवारी नवी दिल्लीत टू प्लस टू चर्चा होईल. भारताच्या दोन महिला मंत्री अमेरिकेच्या दोन पुरुष मंत्र्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. चर्चेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकेल आर. पॉम्पिओ, संरक्षणमंत्री जेम्स एन. मॅटिस हजर राहतील. सूत्रांनुसार, चर्चेत दहशतवाद, इराणकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर अमेरिकेचे प्रतिबंध, भारत-प्रशांत क्षेत्रात संरक्षण सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित राहील. एस-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीसाठी रशियाशी ४० हजार कोटी रुपयांच्या करारासाठी भारताच्या योजनेवरही चर्चा होऊ शकते. अमेरिकेच्या दबावाखाली रशिया-इराणसोबतच्या करारापासून माघार घेणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. 


पॉम्पिओ पाकमधून येत आहेत, नव्या सरकारवर मतप्रदर्शन शक्य 
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ इस्लामाबादहून भारतात येत आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या नव्या सरकारबाबत अमेरिकेचे मत जाणून घेऊ शकतो. अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्डही अमेरिकी शिष्टमंडळात असतील. चर्चेत दोन्ही बाजूंचे १२ अधिकारी राहतील, अशी शक्यता आहे. पॉम्पिओ आणि मॅटिस पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतील. 


गेल्या वर्षी जूनमध्ये मोदी-ट्रम्प चर्चेदरम्यान ठरलेली चर्चा दोन वेळा टळली 
कधी-कधी एखाद्या देशाचा निर्णय दुसऱ्या देशाच्या धोरणावर वाईट परिणाम करतो, तेव्हा दोन्ही देश समस्या सोडवण्यासाठी टू प्लस टू चर्चा करतात. मुख्यत्वे सुरक्षा आणि व्यापारावर चर्चा केली जाते. गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात टू प्लस टू चर्चा निश्चित झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत दोन वेळा ही चर्चा टळली आहे. भारताचा जपानशीही २०१० पासून टू प्लस टू चर्चेचा करार आहे. भारत आणि जपानमध्ये टू प्लस टू सुरक्षा करारावरही चर्चा सुरू आहे. त्यानुसार युद्धाच्या स्थितीत दोन्ही देश परस्परांना कोणत्याही स्थितीत मदत करतात. तिसऱ्या देशाचा हल्ला झाल्यास लष्करी मदत पाठवतात. युद्धासाठी एकमेकांच्या जमिनीचा वापर करतात. भारताचा सध्या कुठल्याही देशाशी असा करार झालेला नाही. 


२० महिन्यांपूर्वी ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हापासून दोन मोठे संरक्षण-व्यापार करार 
>जून २०१८ : ६३४० कोटींच्या सहा अपाचे हेलिकॉप्टरची खरेदी 

जून २०१८ मध्ये अमेरिकेने भारताला ६ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर विकण्यास मंजुरी दिली. त्यांची किंमत ६३४० कोटी रु. आहे. हे हेलिकॉप्टर पुढील भागातील सेन्सरच्या मदतीने रात्रीही उड्डाण करू शकते. 


>मार्च २०१८ : २० वर्षांपर्यंत एलएनजी खरेदीला मंजुरी 
मार्च २०१८ मध्ये भारताने अमेरिकेकडून २० वर्षांपर्यंत एलएनजी खरेदीचा करार केला. पहिल्या टप्प्यात ९० लाख टन खरेदी होईल. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था गॅस आधारित करण्यास मदत मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...