आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushmita Sen Dance Choreographer Pritam Shikhare Like Her Mother: Sushmita Learning Kathak Dance With Choreographer Since 25 Years

कथक डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत, एकानंतर एक नवीन स्टेप शिकली तर कोरियोग्राफरही झाली इम्प्रेस, डान्स टीचरला आई मानते सुष्मिता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियावर आपले काही डान्स व्हिडिओज शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन कथक डान्स ट्रेनर प्रीतम शिखारेकडून ट्रेनिंग घेताना दिसतेय. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय की, सुष्मिता डान्स शिकण्यासाठी घाम गाळतेय. सुष्मिता एकानंतर एक नवीन स्टेप शिकताना दिसतेय. सुष्मिताची कार्यक्षमता पाहून कोरियोग्राफरही इम्प्रेस होते. खुप कमी लोकांना माहिती असेल की, सुष्मिता आपल्या डान्स टिचरला आई मानते. सुष्मिता सेनने व्हिडिओ शेअर करुन एक इमोशनल मॅसेज लिहिला आहे, "एक साधारण मोजणी 1,2,3,4,5 जो आनंद, जागरुकता, बॅलेंस, रिदम आणि ग्रेस वाढवू शकते. प्रीतम शिखारेसारखी सुंदर महिला, जी माझ्यासाठी आई आणि गुरु दोन्हीही आहे. नेहमी मला मूळ गोष्टींकडे घेऊन जाते, ती एक शुध्द आणि दैवीय रुपातील एक स्रोत आहे. हे एक असे ठिकाण आहे जिथे मी फिरते आणि हसते. एवढेच नाही तर 1,2,3,4,5 च्या आवाजावर मस्त नाचते. प्रीतम मां मी तुमच्यावर खुप प्रेम करते. तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा अशीच पसरत राहो, जगाला याची गरज आहे." सुष्मिता सेन गेल्या 25 वर्षांपासून कथक शिकतेय. 


 

 

बातम्या आणखी आहेत...