आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षे लहान बॉयफ्रेंडने सुष्मिताच्या लेकीसाठी केले एक खास काम, आनंदाच्या भरात सुष्मिता म्हणाली रोहमन मुलीचा पिता : Video 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सुष्मिता सेन दिर्घकाळापासून 15 वर्षे लहान बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुष्मिता रोहमनसोबत वर्कआउट व्हिडिओ पोस्ट करत होती. स्वतः रोहमनही सुष्मिता आणि तिच्या दोन्ही मुली रिनी आणि अलीशासोबत रुळला आहे. याच काळात सुष्मिताने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने रोहमन शॉलसोबतच्या नात्याकडेही इशारा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सुष्मिता लवकरच रोहमनसोबत लग्न करु शकते. 

 

सुष्मिता म्हणाली रोहमन मुलीचा पिता 
हा व्हिडिओ सुष्मिताची मुलगी अलीशाच्या स्पोर्ट्स डे इव्हेंटचा आहे. व्हिडिओमध्ये रोहमन शॉलसोबतच इतर मुलांचे वडीलही दिसत आहेत. त्यांनी रेसमध्ये सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे या कॉम्पिटीशिनमध्ये रोहमनने सर्वांना हरवले. रोहमन जिंकल्यामुळे सुष्मिताचा आनंद गगणात मावत नव्हता आणि हा व्हिडिओ शेअर करत तिने रोहमनला अलीशाच्या वडिलांचा दर्जा दिला. सुष्मिताने लिहिले की,  What a MAN!!! Better yet, THAT’S MY MAN!!!😉👊@rohmanshawl wins the #100mts gold (by a mile) for Alisah in the father’s race!!!. सुष्मिताने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. 2000 मध्ये तिने पहिली मुलगी दत्तक घेतली होती, तिचे नाव तिने रिनी असे ठेवले. तर जानेवारी 2010 मध्ये तीने अजून एका मुलीला दत्तक घेतले. तिने नाव अलीशा ठेवण्यात आले.

 
27 वर्षांचा रोहमन शॉल नोएडा येथे राहतो आणि तो एक फ्रीलान्स मॉडल आहे. नोएडामधून मुंबईमध्ये तो मॉडलिंग जगतात करिअर बनवण्यासाठी आला होता. आतापर्यंत त्याने सब्यसाचीसोबतच अनेक फॅशन डिजायनर्सचे शोज केले आहेत. सुष्मिता आणि रोहमनची भेटही एका फॅशन शोदरम्यान झाली होती. तेव्हापासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. स्केचिंग करणे, गाणे गाणे ही रोहमनची हॉबी आहे. त्याला पर्यटनाची आवड आहे आणि पॅरिस हे त्याचे आवडते स्थळ आहे.

बातम्या आणखी आहेत...