आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा बर्थडे सेलिब्रेशनमध्ये विश करण्यासाठी आली \'बीवी नंबर वन\' तेव्हा सलमान खानने परत-परत दिले तिला आलिंगन, खूप नाचले सलमान-सुष्मिता, व्हायरल होतो आहे हा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गुरुवारी सलमान खानने आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याने पनवेल येथील आपल्या फार्म हाऊसवर एक पार्टी दिली. या पार्टीत त्याच्या कुटुुंबातील सदस्यांसह बॉलीवूडच्या अनेक कलावंतांची उपस्थिती होती. पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यापैकी एकामध्ये सलमान आणि सुष्मिता सेनसोबत डान्स करताना आणि भाईजान परत परत सुष्मिताला आलिंगन देताना दिसत आहे. 

 

सलमानच्या ग्रैंड बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सामील झाले बॉलिवूड सेलेब्स...
सलमानच्या ग्रैंड बर्थडे पार्टीमध्ये कतरिना कैफ, बॉबी देओल, अमृता अरोरा, कृति सेनन, मौनी रॉय, जिमी शेरगिल, वत्सल सेठ, सतीश कौशिक, दीया मिर्जा, साहिल संघा, सुनील ग्रोवर, वरुण शर्मा, साजिद-वाजिद, महेश मांजरेकर, सोहेल खान, आयुष शर्मा, सीमा खान यांच्यासह अनेक सेलेब्स पोहोचले. 

 

हा व्हिडिओ शेअर करताना सुष्मिताने लिहिले, "जेव्हा आयुष्य आपल्याला सोबत डान्स करण्याची संधी देते तेव्हा ती आपण सोडत नाही. 'मैंने प्यार किया' च्या प्रेमला प्रेम करण्यासपासून ते 'मैंने प्यार क्यों किया'मध्ये त्याच्यासोबत काम केल्यापर्यंतचा प्रवास मजेदार होता. हॅप्पी बर्थडे त्या माणसाला, जो कधीच थांबत नाही आणि नेहमी साजरे करत राहतो 'बीइंग ह्युमन'ला. तुला नवे वर्ष आनंदी जावो". 

 

सलमानची बर्थडे पार्टी बुधवारी रात्री सुरु झाली आणि शुक्रवारी सकाळी संपली. 

 

बातम्या आणखी आहेत...