आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushmita Sen Broke The Rumor Of The Breakup, Shared The Photo With Rohaman And Wrote, 'I Love You'

ब्रेकअपच्या पसरत्या अफवांवर सुष्मिता सेनने तोडले मौन, रोहमनसोबत फोटो शेअर करून लिहिले, 'आय लव्ह यू'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सुष्मिता सेन आपल्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या आयुष्यात अनेक बॉयफ्रेंड्स आले आणि गेले. तिने आतापर्यन्त 11 जणांना डेट केले आहे. सध्या आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या रोहमान शॉलला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. सर्वानाच वाटले की, आधीच्या 11 नात्यांसारखे हे नातेदेखील तुटून जाईल. पण रोहमनसोबत एक फोटो शेअर करून तिने या सर्व बातम्यांचे खानदान केले आहे. 

 

सुष्मिताने इंस्टाग्रामवर रोहमनसोबत वर्क आउट करतानाच फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने लिहिले, 'मुलगा उदार आहे...मुलगी स्वार्थी..आय लव्ह यू रोहमन शॉल.' अभिनेत्रीच्या पोस्टनंतर तिचे फॅन्स खूप खुश आहेत. 

 

सुष्मिता सेनची इंस्टापोस्ट...  

 

 

अभिनेता अचिंक कौरनेदेखील या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने लिहिले, 'नेहमी खुश राहा.'

 

फॅन्सने केल्या अशा कमेंट्स... 
- 'तुम्ही दोघे कणखरपणा आणि आनंदाची निशाणी आहात. खूप प्रेरणादायक आहे.'

- 'तुम्ही दोघे एकत्र खूप विशेष दिसत. देव तुम्हाला दोघांना नेहमी आनंदात ठेवो. खूप सारे प्रेम.'

 

रोहमनच्या एका पोस्टमुळे लावले जात होते ब्रेकअपचे अंदाज... 
काही दिवसांपूर्वी सुष्मिताचा भाऊ राजीव सेन आणि चारू आसोपाच्या लग्नातही हे कपल सोबतच दिसले होते. दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या रोहमनच्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे पसरल्या होत्या. त्याने आपल्या पोस्टमध्ये नात्याबद्दल जे काही लिहिले होते, त्यामुळे सर्वांचं वाटले की, कदाचित रोहमन-सुष्मिता यांच्यामध्ये काही तीन नाहीये. 

 

रोहमनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, 'जर तुम्हला असे वाटते की, कुणासोबत नात्यात येऊन तुम्ही केवळ या नात्यामध्ये योगदान देत आहात तर असे नाहीये. ऐक मी तुझ्याशी बोलत आहे. मला सांग तुला कोणती गोष्ट परेशान करत आहे ? मी इथेच आहे 24 तास. माझ्याशी बोल.'