Home | News | Sushmita Sen Mourns At Former Miss Universe Chelsi Smith Death

सुश्मिता सेनने जिच्या डोक्यावर चढवला होता मिस युनिव्हर्सचा मुकूट, कॅन्सरने झाले तिचे निधन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 02:22 PM IST

माजी मिस वर्ल्ड चेल्सी स्मिथ हिचे निधन झाले आहे. 45 वर्षीय चेल्सी लिव्हरच्या कॅन्सरशी लढा देत होती.

 • Sushmita Sen Mourns At Former Miss Universe Chelsi Smith Death


  मुंबईः माजी मिस वर्ल्ड चेल्सी स्मिथ हिचे निधन झाले आहे. 45 वर्षीय चेल्सी लिव्हरच्या कॅन्सरशी लढा देत होती. चेल्सीला मिस युनिव्हर्सचा मुकूट घालणारी सुश्मिता सेन हिने तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सुश्मिताने एका ट्वीटमध्ये लिहिले, "मला तिचे हास्य आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्व पसंत होते. माझी प्रिय मैत्रीण आणि 1995 ची मिस युनिव्हर्स चेल्सी स्मिथ हिच्या आत्म्याला शांती लाभो." 1994 साली सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. त्याच्या पुढच्या वर्षी चेल्सी मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुश्मिताने तिला हा ताज घातला होता.


  टीव्ही स्टारने शेअर केले चेल्सीच्या निधनाचे वृत्त..

  - सुश्मितापूर्वी टीव्ही स्टार शेना मॉक्लरने चेल्सीच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. शेनाने लिहिले होते, "हा अतिशय दुःखद प्रसंग आहे. माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या निधनाचे वृत्त मिळाले. ती किती फनी, प्रेमळ आणि स्मार्ट होती, हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही."

  चेल्सीविषयी...
  - 1995 मध्ये मिस यूएसएचा किताब जिंकल्यानंतर चेल्सीने मिस युनिव्हर्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि ती विजेती ठरली होती. याशिवाय तिने डॉक्युमेंट्री 'The History of the Bathing Suit' मध्येही काम केले होते. 2003मध्ये चेल्सी 'Playas Ball' या चित्रपटात दिसली होती. 2006 मध्ये ती मिस टीन यूएसएची जज आणि 2016 मध्ये मिस पेरू ब्यूटी पेजेंटची गेस्ट जज होती.

Trending