आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवच्या समुद्रात मस्ती करतांना दिसली सुष्मिता सेन, व्हिडीओ वेगाने होत आहे व्हायरल 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने अशातच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावर मस्ती करताना दिसत आहे. सुष्मिता सेन सध्या मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. सुष्मिताने शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुष्मिताने लिहिले आहे, 'हा ग्लो तेव्हा येतो जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचे आयुष्य जगत असता. अशी सकाळ, हा समुद्र आणि ही रेती.' 



सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने व्हाइट कलरचा सिल्क ड्रेस घातलेला आहे. सुष्मिता सेन या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि ती खूप आनंदीदेखील दिसत आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत आणि तिचे कौतुकदेखील करत आहेत.