• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Sushmita sen's brother Rajiv sen and Charu asopa are getting troll due to the pictures of them with a tiger in zoo

Bollywood / सुश्मिता सेनचा भाऊ राजीवच्या हनीमूनचे फोटोज झाले व्हायरल, वाघासोबत अशा पोज दिल्यामुळे राजीव-चारू होत आहेत ट्रोल 

चारू आणि राजीवने शेअर केले हनीमूनचे अनेक फोटोज  

दिव्य मराठी

Jul 01,2019 12:47:28 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने अशातच अभिनेत्री चारू असोपासोबत 16 जून को हिंदू रितीरिवाजांप्रमाणे लग्न केले आहे. मात्र यापूर्वीही दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. चारू एक टीव्ही अभिनेत्री आहे तर राजीव ज्वेलरी बिजनेसमन आहे. लग्नानंतर राजीव आणि चारू सध्या थायलँडमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत. दोघे सतत सोशल मीडियावर त्यांच्या हनीमूनचे फोटोज शेअर करत आहेत. हनीमूनचे लवी डवी फोटोज सोडत आता त्यांचे असे काही फोटोज समोर आले आहेत, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे.

या फोटोजमध्ये राजीव आणि चारू एका वाघासोबत दिसत आहेत. एवढेच नाही तर दोघांनी वाघासोबत भरपूर पोज दिल्या कधी वाघाच्या अंगावर डोके ठेवले तर कधी वाघाला आलिंगन देत आहेत. वाघासोबत चारू आणि राजीवच्या अशा पोज पाहून सोशल मीडियावर यूजर्सने त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

काय म्हणाले युजर्स...
- 'हे खूप फालतू आहे.'
- 'तुम्हाला माहित तरी आहे का वाघांसोबत कोणत्या मर्यादेपर्यंत क्रूरता केली जाते ? त्यांना नशेची औषधे दिली जातात. प्राणी संग्रहालयात असे वागून या प्रकारांना प्रोत्साहन देऊ नका. सेलिब्रिटीजचे ट्रेंड सामान्य लोकदेखील फॉलो करतात.'

X