आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींसह 101 वर्षांच्या आजीबरोबर सुष्मिताने साजरा केला कन्या दिन, आजी म्हणाल्या - परत ये एकदा घरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - प्रसिद्ध अॅक्ट्रेस आणि माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. ती नेहमी चाहत्यांसाठी काहीतरी खास सरप्राइज देत असते. नुकतेच तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून असेच सरप्राइज दिले. सुष्मिताने एका 101 वर्षांच्या आजीबरोबर तिच्या मुलींसह कन्या दिन साजरा केला. या दिवसाचा व्हिडिओ सुष्मिताने इन्स्टाग्रामवर शेअर केला. 


सुष्मिताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती या 101 वर्षांच्या आजीबरोबर तिच्या मुलीसह बसलेली दिसत आहे. त्यात ती आजीकडून आशीर्वाद घेताना दिसतेय. तसेच आजी तिला पुन्हा कधीतरी एकदा घरी ये.. असे म्हणत असल्याचे दिसत आहे.

 

सुष्मिताने या व्हिडिओबरोबर पोस्ट करत लिहिले, या आजीकडून मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद हीच मोठी संपत्ती आहे. अशा लोकांना भेटण्याची संधी मिळते हे माझे सुदैव आहे. तसेच या पोस्टमध्ये सुष्मिताने म्हटले मी पुन्हा नक्की येईन. 

 

बातम्या आणखी आहेत...