आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाचीवाडी येथील दुबईहून आलेल्या कोरोना संशयित तरुणाला सोलापूरला हलविले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण गावाची होणार आरोग्य तपासणी

सम्मेद शहा पापरी- वडाचीवाडी येथील दुबईहून आलेल्या एका कोरोना विषाणु संसर्ग सदृश्य आजाराची  लक्षणे आढळून आलेल्या ग्रामस्थाला अनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने पुढील अधिकृत तपासणीसाठी  सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. तेथील तपासणी झाल्यावरच खरे निदान स्पष्ट होणार आहे. संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य पथक संपूर्ण  वडाचीवाडी गावचाच आरोग्य सर्वे करणार असल्याचे अनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास कादे यांनी सांगितले. वडाची वाडी हे गाव अनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्यखाली येते.  यासंदर्भात वडाचीवाडी येथे जाऊन अधिक माहिती घेतली असता डॉ. कादे म्हणाले, वडाचीवाडी गावातील  रहिवाशी असलेले संशयित ग्रामस्थ तीन मार्च रोजी दुबईहून पुणे विमानतळावर उतरले, दुबईवरून आल्याने त्यांची विमानतळावर तपासणी झाली नंतर ते 4 मार्च रोजी सायंकाळी वडाचीवाडी येथे आले मात्र 11 एप्रिल रोजी त्यांना सर्दी, पडसे, घसा खवखवने असा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ते खाजगी दवाखान्यात गेले, त्या ठिकाणी तपासणी झाल्यावर संबंधित डॉक्टरने त्यांस अधिकृत तपासण्याकरसाठी सोलापूर येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि त्यांस होत असलेला ताप, सर्दी, घसा खवखवने, आदि त्रास कमी व्हावा म्हणून गोळ्या दिल्या, संबंधित खाजगी डॉक्टरांनी हा प्रकार अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकाऱ्याना कळविला. आज अनगर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास कादे यांच्या पथकाने वडाचीवाडी येथे दाखल झाले. संशयित रुग्णाची तपासणी करून त्यास अधिकृत तपासणी साठी सोलापुरला पाठविले आहे. तसेच त्याच्या घरच्या सदस्यांची व ते गावात आल्यावर त्यांच्या संपर्कत कोण कोण आले आहे यांची चौकशी सुरु केली आहे, त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मास्क दिले आहेत,संपूर्ण  गावातही मास्क वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी संयम राखावा अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन कादे यांनी ग्रामस्थाना केले.

बातम्या आणखी आहेत...