गडचिरोली / गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा पोलिस ठाण्यात कार्यरत शिपायाचा संशयास्पद मृत्यू

सिरोंचा पोलिस ठाण्यात क्वीक रिस्पॉन्स पथकात कार्यरत होता शिपाई

प्रतिनिधी

Aug 13,2019 11:38:00 AM IST

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाचा सकाळी संशायस्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. संजीव रामय्या सेट्टीवार (वय३०वर्षे) असे या शिपायाचे नाव आहे. तो नरहसिंहपल्ली येथील रहिवासी होता.

संजीव दोन वर्षांपासून सिरोंचा पोलिस ठाण्यात क्वीक रिस्पॉन्स पथकात कार्यरत होते. ते आपल्या कुटूंबासह सिआरपीएफ कँम्प परिसरात रहात होते. सकाळी घरातून गोळी झाडण्याचा आवाज आला. गंभीर जखमी अवस्थेत सिरोंचा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना वरंगल येथील खासगी रुग्णालयात भरती केले आसता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काहींचे म्हणणे आहे की रायफल साफ करत असताना गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला तर काहींच्या मते शिपायाने आत्महत्या केली आहे.

X
COMMENT