आंतरराष्ट्रीय / पाकिस्तानातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू, भावाने व्यक्त केला खूनाचा संशय

मृत नम्रता चांदनी डेंटल सर्जरीच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये होती

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 04:02:00 PM IST

कराची- पाकिस्तानात राहणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या हिंदू विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नम्रता चांदनी असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून, ती लरकानाच्या बीबी आसिफा डेंटल कॉलेजमध्ये बीडीएस लास्ट सेमिस्टरला शिकत होती. चांदनीचा मृतदेह तिच्या हॉस्टलच्या रुममध्ये पलंगावर आढळला. मृतदेहाच्या गळ्यात दोरी गुंडाळलेली होती. सध्या पोलिस घटनेचा तपास करत आहे. पण अद्याप नम्रताने आत्महत्या केली का तिचा खून झाला, याचा तपास लागला नाहीये. पाकिस्तानात अल्पसंख्यकांवर होणाऱ्या हल्ल्यात मेडिकलच्या विद्यार्थीनीच्या मृत्यूमुले अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नम्रताचा भाऊ डॉक्टर विशाल याचे म्हणने आहे की, नम्रताने आत्महत्या केली नाही, तिचा खून झाला आहे. आम्ही लोकांकडून मदतीची अपेक्षा करतो.

नम्रता मूळ मीरपूर जिल्ह्यातील घोटकीची राहणारी होती. तिचे कुटुंब सध्या कराचीमध्ये राहत होते. कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. सध्या मृतदेहाला शवविच्छेदानासाठी पाठवले असून, तिची रुमही सील केली आहे. नम्रताच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, ती खूप धाडसी मुलगी होती आणि मृत्यूपूर्वी कोणत्याही तनावात नव्हती. मृत्यूच्या काही तासांपूर्वी तिने आपल्या मित्रांसोबत वेळ घालवला होता.

X
COMMENT