आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोयंबटूर(तमिळनाडू)- श्रीलंकेतील सीरियल बॉम्ब ब्लास्टची जबाबदारी घेणारी दहशदवादी संघटना इस्लामिक स्टेट(आयएसआयएस)चे लक्ष आता भारतावर आहे. तमिळनाडूच्या कोयंबटूरमध्ये राष्ट्रीय तपास एजंसी(एनआयए)ने 12 जूनला चार संशयित आयएस समर्थकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आयएसचे दहशदवादी भारतातील अनेक मंदिर आणि चर्चमध्ये ब्लास्ट करण्यासाचा कट रचत आहेत. हे तिघेही त्याच प्रकरणात सामिल होते.
भारतीय तपास विभागाने पत्र लिहून केले अलर्ट
राष्ट्रीय तपास एजंसी(एनआयए)ने श्रीलंकेतून मिळालेल्या इनपुटनंतर 12 जूनला कोयंबटूरमधील सात ठिकाणावर छापेमारी केली. यादरम्यान एनआयएने जणांना ताब्यात घेतले. यात श्रीलंका बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी जहरान हाशिमचा फेसबूक मित्र मोहम्मद अजरुदीनदेखील सामिल होता. इतर संशयितांमध्ये शाहजहां, मोहम्मद हुसैन आणि शेख सैफुल्लाह आहे.
गुप्त विभागाने केरळ पोलिस प्रशासनला पत्र लिहून अलर्ट केले आहे. सूत्रांनुसार, पत्रात म्हणले आहे की, आयएसला सीरिया आणि ईराकमध्ये खूप नुकसान झाले आहे, त्यामुळेच आयएस आता हिंद महासागर क्षेत्राकडे वाढत आहे. तसेच आयएसने आता आपल्या समर्थकांना आपापल्या देशात राहूनच दहशदवादी कारवाया सुरू ठेवण्यास सांगितले आहे. कोच्ची आणि कोयंबटूरमधील अनेक महत्त्वाचे परिसर आयएसच्या निशन्यावर आहेत.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, मागील काही वर्षांमध्ये केरळमधील कमीत कमी 100 लोक ISIS मध्ये सामिल झाले आहेत. राज्यातील जवळपास 3000 संशयितांवर पोलिस लक्ष ठेवून आहे. यामधील बहुतेक लोक भारताच्या उत्तरेकडील आहेत.
श्रीलंकेच 21 एप्रिलला ईस्टरच्या दिवसी चर्च आणि हॉटेलमध्ये 8 सीरिअल ब्लास्ट झाले होते. यात 11 भारतीयांसहित 258 लोकांचा मृत्यू झाला होता. भारतीय गुप्त विभागाने श्रीलंकेला ब्लास्टच्या 15 दिवसांपूर्वीच हाय अलर्ट पाठवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.