आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसादामध्ये विष कालवण्याचा कट, परदेशातून इंटरनेटद्वारे दिले जात होते प्रशिक्षण : एटीएसचा दावा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून अटक झालेल्या तरुणांनी महाप्रसादात विष कालवण्याचा कट आखला होता. त्यांना परदेशातून इंटरनेटद्वारे प्रशिक्षण दिले जात होते, असा दावा मंगळवारी एटीएसने केला. या नऊ संशयितांची पोलिस कोठडी मंगळवारी (५ फेब्रुवारी) संपली. त्यांना विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांच्यासमोर हजर केले असता फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नऊ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली. हे नऊ संशयित १४ फेब्रुवारीपर्यंत एटीएसच्या ताब्यात राहतील. 


एटीएसच्या पथकाने २२ जानेवारी रोजी मुंब्रा येथील उमते महंमदिया ग्रुपच्या आणि औरंगाबाद येथील इसिसच्या मोहसीन सिराजुद्दीन खान (३२, दमडी महल), महंमद मशाहिद उल इस्लाम (२३, कैसर कॉलनी), महंमद सरफराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२३, राहत कॉलनी), महंमद तकी ऊर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (२०, कैसर कॉलनी) ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड (३२, मुंब्रा ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान (२८, मोतीबाग, मुंब्रा ठाणे), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (अल्माश कॉलनी, मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख (२१, मुंब्रा ठाणे)तलहा ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरिक (रा मुंब्रा) या नऊ जणांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होते. 


सरकारी वकिलांचा युक्तिवाद असा 
विषारी द्रव्य जप्त करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना १४ दिवसांत इसिस समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली. त्यांच्या ताब्यातून हार्डडिस्कही जप्त केल्या आहेत. 
मुंबई, पुणे आणि औरंगाबादेतील मंदिरासमोर वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालवण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी विष टाकून तसा पदार्थही तयार केला होता. तो जप्त करण्यात आला आहे. 


परदेशात यांनी कोणासोबत चॅटिंग केली, हे तपासण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला असून त्याची तपासणी करावयाची आहे, हार्डडिस्कमधील माहिती तपासायची असल्यामुळे पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. 


केंद्र शासनाला अंधारात ठेवून एटीएसची कारवाई : बचाव पक्ष 
महाराष्ट्र एटीएसने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. १८ ऑगस्टपासून या सर्वांचे फोन टॅप होत होते. मात्र त्याची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली नाही. याशिवाय आतापर्यंत केलेली अटक, जप्त साहित्याची माहितीही केंद्राला देण्यात आली नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला. एटीएसने पोलिस कोठडीसाठी न्यायालयात सादर केलेल्या मुद्द्यातही विराेधाभास आहे. मुंबईहून आलेले ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. तैवार पठाण यांनी बचाव पक्षाकडून युक्तिवाद केला. अॅड. खिजर पटेल यांनीही बाजू मांडली. 

बातम्या आणखी आहेत...