आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारी स्केटिंग काेच पाेलिस सेवेतून निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव -  पोलिस दलात नाईक पदावर काम करणारा तसेच कराटे व स्केटिंगचा कोच असलेल्या पाेलिस कर्मचारी विनोद पीतांबर अहिरे (वय ३९, रा. वाघनगर)याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावास जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने चार महिने अत्याचार केला. या प्रकरणी रविवारी अहिरेला अटक झाली असून सोमवारी न्यायालयात हजर केले असता अहिरे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच पोलिस अधीक्षक डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी त्याला निलंबित केले अाहेे. अहिरे याने पीडित मुलीसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केल्याचा यूक्तीवाद सरकारी वकील केतन ढाके यांनी न्यायालयात केला. 


अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रविवारी रात्री अहिरे याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी त्याला पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दालनात बोलावून घेतले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपासाधिकारी तथा पाेलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता त्याला न्यायाधिश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात अाले. अहिरे याने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद आहे, त्याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या घटना-स्थळांवर जाऊन पंचनामा करायचा आहे. अहिरे हा पोलिस कर्मचारी असून त्याने पीडित मुलीच्या भावास जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. तसेच आणखी काही तरुणींसोबत त्याने असे काही प्रकार केले आहेत काय? याची चौकशी करायची असल्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती सरकारी वकील केतन ढाके व पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी न्यायालयास केली. तर संशयित अहिरे याच्यातर्फे अॅड. जयंत मोरे यांनी युक्तीवाद केला. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे घडलेल्या घटना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीसह दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे कमीत-कमी दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती अॅड. मोरे यांनी केली. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद एेकुन घेतल्यावर न्यायालयाने अहिरे याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. २ नोव्हेंबर रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अाराेपी अहिरेला सेनेतून निलंबित केले.

 

विभागीय चौकशी सुरू : अहिरे याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होऊन अटक व पोलिस कोठडी मिळालेल्या अहिरे याला सोमवारी रात्री सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पाेलिस अधिक्षकांनी ही कारवाई केली. 
चेहऱ्यावर बुरखा घालून अाणले हाेते न्यायालयात

बातम्या आणखी आहेत...