आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज माफियाची पोलिसांना मैत्री भोवली..नागपुरात 4 उपनिरीक्षकांस 6 अधिकारी तडकाफडकी निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कुंपनच शेत खात असल्याचा धक्कादायक प्रकार राज्याच्या उपराजधानी अर्थात नागपुरात समोर अाला आहे. मध्य भारतातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया आबू खान याला सहकार्य केल्याप्रकरणी नागपुरातील 4 उपनिरीक्षकासह 6 पोलिस अधिकार्‍यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

आबू खान याला दोन आठवड्यांपूर्वी क्राइम ब्रॅंचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्याकडे चौकशीत त्याला सहकार्य करणार्‍या चार पोलिस उपनिरीक्षकांसह 6 कर्मचार्‍यांना नागपूर पोलिस आयुक्तांनी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

हुडकेश्वर पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षक नीलेश पुरभे, सक्करदर्‍यातील उपनिरीक्ष मनोज ओरके, तहसीलमधील शरद शिकणे, साजीद मोवाल यांच्यासह पोलिस कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्रा अशा सहा जणांना निलंबित केले आहे.

 

3 लाखांचे एमडी पावडर जप्त...
कुख्यात ड्रग्ज माफिया आबू खान यांच्या दोन साथीदारांकडून पोलिसांनी 3 लाखांचे एमडी पावडर जप्त केली आहे. या दोघांच्या अटकेतून आबू खानच्या नेटवर्कची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर प्रथम आबूला अटक करण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले.

बातम्या आणखी आहेत...