आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये धिंगाणा घालणारे २ पोलिस कर्मचारी निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी- दारु पिल्यानंतर हॉटेल मालकाने बिल मागितले म्हणून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हॉटेलच्या मालकाला शिवीगाळ करीत नोकरांना मारहाण करुन हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घनसावंगी येथील हॉटेल मधुबन येथे बुधवारी घडली होती. यानंतर या पोलीसांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत असतांना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्यांनी चार पोलीसांवर हल्ला करुन फरार झालेले संदीप राठोड, आतिष चौधरी या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांकडून निलंबीत करण्यात आल्याची कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. 


हॉटेल व पोलीस ठाण्यात केलेल्या तोडफोडीमुळे हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजले. या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगन यांनी भेट देऊन पाहणी केली होती. यानंतर हॉटेल मालकाच्या तक्रारीवरुन घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करुन नोटीसा देऊन जबाब मागविण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...