आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप १० डिसेंबरपर्यंत स्थगित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतनकरार त्वरित लागू करावा, बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप करावे, पेन्शन रिव्हिजन, पेन्शन अंशदान मूळ वेतनावर व्हावी या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यासाठी 'अाॅल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल'तर्फे सोमवार (दि. ३)पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारण्यात अाला हाेता. मात्र, मागण्यांसंदर्भात संचार राज्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याने तूर्तास १० डिसेंबरपर्यंत संप स्थगित करण्यात अाला अाहे. 

 

दूरसंचार विभागाचे सचिव व 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएल' यांच्यात बैठक झाली. सरकारी नियमानुसार फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप, पेन्शन रिव्हिजन, बीएसएनएलद्वारे पेन्शन अंशदान मुद्यांमध्ये सुधारणा झाली असली तरी तृतीय वेतन पुनरावृतीच्या प्रकरणात डेडलॉक चालू आहे. या विषयाच्या स्थितीवर सचिवांनी दिलेल्या उत्तराने युनियनचे समाधान झाले नाही. या परिस्थितीत संचार राज्यमंत्री यांच्याशी चर्चा सुरू असल्याने एका आठवड्यासाठी संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे. मंत्रीमहाेदयांसाेबत समाधानकारक चर्चा न झाल्यास १० डिसेंबरला रात्री १२ पासून बेमुदत संपास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी अनिल पाटील, शशिकांत भदाणे, दिलीप गोडसे यांनी दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...