Home | Maharashtra | Vidarva | Akola | Suspension of court stay on order of Personal Recognition cancellation

वैयक्तिक मान्यता रद्द करणाऱ्या आदेशाला न्यायालयाकडून स्थगिती; शिक्षिकांना मिळाला दिलासा

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 01:34 PM IST

वाशीम जिल्ह्यातील दोन शिक्षिकांची शिक्षण उपसंचालकांनी रद्द केलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या आदेशाला नागपूर खंडपीठाच्या द्व

  • Suspension of court stay on order of Personal Recognition cancellation

    अकोला- वाशीम जिल्ह्यातील दोन शिक्षिकांची शिक्षण उपसंचालकांनी रद्द केलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या आदेशाला नागपूर खंडपीठाच्या द्विसदस्यीय बेंचने स्थगिती दिली. त्यामुळे दोन शिक्षिकांना दिलासा मिळाला अाहे. शिक्षण उपसंचालकांनी एकूण १३९ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द केली होती.


    वाशीम जिल्ह्यातील १३९ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता अमरावती शिक्षण उपसंचालकांनी काही दिवसांपूर्वीच रद्द केली होती. २०१३-२०१४ पासून कार्यरत असलेल्या या शिक्षिकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यानंतर हे प्रकरण मान्यते करीता शिक्षण उपसंचालकांकडे गेले. शिक्षण उपसंचालकांनी चौकशी करून १३९ शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द केल्या. या निर्णयामुळे वाशीम जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कारण वैयक्तिक मान्यता रद्द होणे म्हणजे सरळ नोकरी जाणे होय. त्यामुळेच १३९ शिक्षकांपैकी सोनाली चिंचाळे आणि सविता राऊत यांनी शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या या निर्णयाला नागपूर हायकोर्टात आव्हान दिले.


    नागपूर हायकोर्टात या प्रकरणाची २३ ऑगस्टला सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि मुरलीधर गिरटकर यांनी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्या नंतर शालेय शिक्षण क्रीडा विभाग, आयुक्त शिक्षण पुणे, शिक्षण संचालक पुणे, शिक्षण उपसंचालक अमरावती, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच संबंधित शाळा व संस्थांच्या नावे नोटीस काढल्या. त्याच बरोबर शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे या दोन शिक्षिकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयात शिक्षिकांची बाजू अॅड. आनंद राजन देशपांडे यांनी मांडली तर शिक्षण विभागाकडून साहाय्यक सरकारी वकिलांनी बाजू मांडली.

Trending