Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Suspicion about degree of Municipal Health Officer Borge

महापालिका आरोग्य अधिकारी बोरगे यांच्या पदवीबाबत संशय; आयुक्तांकडे तक्रार

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 01:20 PM IST

महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदासाठी २०१६ मधील 'पॅटर्न'नुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिका

  • Suspicion about degree of Municipal Health Officer Borge

    नगर- महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदासाठी २०१६ मधील 'पॅटर्न'नुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे नाही, तसेच जुन्या पात्रतेनुसार या पदासाठी डीपीएच पात्रता बंधनकारक असून दोन वर्षांची पदविका आवश्यक आहे. पण डॉ. बोरगे यांनी केवळ अकरा महिन्यांत ही पदवी प्राप्त केल्याने त्यांची पदवीच संशयास्पद आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी िजल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.


    मनपात वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. बोरगे यांची नेमणूक करण्यात आली, पण त्यांच्याकडे २०१६ च्या आकृतिबंधानुसार पात्रता नाही. तथापि जुन्या पात्रतेप्रमाणे त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जुन्या पात्रतेनुसार डीपीएच (डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ) ही पात्रता बंधनकारक आहे. पदव्युत्तर पदविकेचा कार्यकाळ दोन वर्षाचा आहे. तथापि, डॉ. बोरगे यांनी केवळ अकरा महिन्यांंत ही पदविका प्राप्त केली. तसेच ही पदविका घेण्यासाठी त्यांच्याकडे परवानगी नव्हती. राज्यातील विविध कॉलेजमध्ये एक वर्षाचा वैद्यकीय पदविकेचा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. त्यामुळे ही पदवी संशयास्पद असल्याने मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र व मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे चौकशी करावी, अशी मागणीही बोराटे यांनी आयुक्तांना दिलेल्या िनवेदनात केली आहे.

Trending