आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधनासाठी गैरप्रकाराचा संशय; तणाव वाढल्याने एक जण ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रविवारच्या अमावस्येच्या पार्श्वभूमीवर चिकलठाणा परिसरात  चौधरी कॉलनीत गुप्तधनासाठी नरबळी किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याच्या संशयावरून रात्री  १ च्या सुमारास तणाव निर्माण झाला. घरमालक व त्याच्या मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घरमालकाच्या मुलास ताब्यात घेतले. या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या घरातील दोन खोल्यांत खोल मोठे खड्डे खोदलेले असून त्यात उभी शिडी आढळून आली. तसेच उदबत्तीचा सुगंधदेखील दरवळत होता. या परिसरात हे दोन खोल्यांचे पत्र्याचे घर आहे. महिनाभरापासून या ठिकाणी फक्त रात्रीच काही लोक घरात मातीकाम करत होते.  भोवती हिरव्या मॅट लावलेल्या होत्या. रविवारीदेखील दोन लोक घरात घुसले. अमावस्या असल्याने स्थानिक नागरिकांचा याबाबत संशय बळावला.पाहता पाहता जमाव जमला. तणाव वाढल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले. 

 

४० फुटांचे खड्डे : दोन्ही खोल्यांमध्ये जवळपास ४० फूट खोल खड्डे आढळून आले. याबाबत विचारणा केल्यावर घरमालक व त्याच्या मुलाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला.