आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्यासह विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत दोघांचे मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर-  विवाहित मुलीसह पित्याचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कसई येथे बुधवारी (दि. २१) दुपारी उघडकीस आली. दरम्यान, दोघांच्या मृत्यूच्या कारणांविषयी स्पष्टपणे बोलण्यास पोलिसांनी  नकार दिला. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. 


कसई येथील शिवाजी मनोहर भोवाळ (५२) व त्यांची विवाहित मुलगी उषा (३५) या दोघांचे मृतदेह कसई शिवारातील सुधाकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे समजले. 
 याप्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. विहीरीत पाणी अधिक असल्याने मृतदेह काढण्यात अडचणी येत होत्या. सुरूवातीला ३ च्या सुमारास शिवाजी भोवाळ यांचा मृतदेह सापडला तर तब्बल दीड तासानंतर ४.३० च्या सुमारास मुलगी उषाचा मृतदेह सापडला. 

बातम्या आणखी आहेत...